मुगळी येथे विकासकामांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:28+5:302021-04-05T04:21:28+5:30
मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील २५ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांना आ. राजेश पाटील व माजी आ. संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते ...

मुगळी येथे विकासकामांना प्रारंभ
मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील २५ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांना आ. राजेश पाटील व माजी आ. संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
यावेळी जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष उदय जोशी, जिल्हा बँक संचालक संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच बाळय्या स्वामी यांनी स्वागत केले.
यावेळी प्राथमिक शाळा ते कल्लाप्पा धनवडे या ५०० मीटर डांबरीकरणाचे पूर्ण झालेल्या रस्त्याचे लोकार्पण आ. पाटील यांच्या हस्ते तर जनसुविधा फंडातून झालेल्या रस्त्याचे लोकार्पण माजी आ. कुपेकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास बाळासाहेब महाडीक, रायगोंडा पाटील, नितीन पाटील, सुरेश धनवडे, कल्लाप्पा धनवडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले.
----------------------------
* फोटो ओळी : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील रस्त्याचे लोकार्पण माजी आ. संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते झाले. शेजारी आ. राजेश पाटील, उदय जोशी, संतोष पाटील, बाळय्या स्वामी आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०४०४२०२१-गड-०९