गट-तट न पाहता विकासकामांना प्राधान्य द्यावे : वीरेंद्र मंडलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST2020-12-15T04:41:06+5:302020-12-15T04:41:06+5:30
हसूर खुर्द (ता.कागल )येथे गावास पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गेल्या पावसाळ्यात चिकोत्रा नदीला महापूर आला. या ...

गट-तट न पाहता विकासकामांना प्राधान्य द्यावे : वीरेंद्र मंडलिक
हसूर खुर्द (ता.कागल )येथे गावास पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
गेल्या पावसाळ्यात चिकोत्रा नदीला महापूर आला. या महापुरामध्ये सदर जॅकवेल कोसळले होते. कमीत कमी वेळेमध्ये ठेकेदारने जॅकवेलचे बांधकाम पूर्ण केले. यामुळे गावचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी अंबरीश घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे,धनाजीराव काटे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आप्पासोा तांबेकर धनाजी काटे, तानाजी पाटील, पुंडलिक पाटील, माजी सरपंच सरिता गडकरी, माजी उपसरपंच दत्तात्रय पाटील, सुभाष गडकरी, ए. जी. साळोखे, ए. एस. पाटील, दगडू पाटील, हरी चावरे, संदेश पाटील, ग्रामसेवक गोविंद पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक अशोक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विश्वनाथ चावरे यांनी तर आभार के. टी. पाटील यांनी मानले.
फोटो :- हसूर खुर्द (ता. कागल )येथील जॅकवेलचे उद्घाटन करताना वीरेंद्र मंडलिक, यावेळी अंबरिशसिंह घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, आप्पासाहेब तांबेकर, संदेश पाटील, धनाजी काटे आदी उपस्थित होते