शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या भाविकांच्या ऑनलाइन फसवणुकीबाबत देवस्थानची 'सायबर'कडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:15 IST

लोकमत इफेक्ट : पोलिसांनी घेतली दखल

कोल्हापूर : गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्री अंबाबाईच्या नावे भाविकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्या समाजमाध्यमावरील एआय जनरेटेड जाहिरातीविरोधात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंगळवारी सायबर क्राइमकडे, तसेच जुना राजवाडा पोलिस ठाण्यातदेखील तक्रार केली. या व्हिडीओबाबत पोलिस तपास करीत असून, गुन्हा दाखल केला जाईल.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील देवता असलेल्या अंबाबाईला गुढीपाडव्याला साडी अर्पण करण्याची कोणतीही पद्धत नाही. इथे पैसे घेऊन कोणतेही बाह्य धार्मिक विधी केले जात नाहीत. असे असताना गेल्या काही दिवसांपासून यजमान डॉट इन या समाजमाध्यमावरील फेसबूक पेजवर अंबाबाई मंदिराचा एआय जनरेटेड व्हिडीओ करून ३५१ रुपयांची मागणी केली जात आहे. फक्त ३५१ रुपये भरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवीला साडी अर्पण करा, असे आवाहन केले जात आहे.यापूर्वीदेखील अशा अनेक सोशल साइट्सवरून अंबाबाई भक्तांची फसवणूक केली जात असतानाही त्याची दखल घेतली गेली नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व श्रीपूजकांनी तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.याबाबतचे वृत्त सोमवारी कोल्हापूर ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी समितीला तक्रार करण्यास सांगितले. मात्र, सायबर क्राइम विभागाने याची दखल घेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे याची चौकशी केली. समितीनेदेखील जुना राजवाडा पोलिस ठाण्याला तक्रार नोंदवली. यासह सायबर क्राइम विभागाकडेही तक्रार देण्यात आली आहे.कसा केला जातो तपास...देवस्थान समितीने या व्हिडीओ, तसेच अन्य सोशल साइटच्या लिंक सायबर क्राइम विभागाला दिल्या आहेत. हे व्हिडीओ कुठे तयार झाले, कुणी बनवले, त्याचा क्रिएटर कोण, व्हायरल कुणी केले, किती व्हायरल झाले, संबंधित लिंकवरून बँक खात्यात काही व्यवहार झाले आहेत का, या सर्व बाबींची तपासणी केली जाईल. देवस्थान समितीशी चर्चा करून गुन्हा नोंद केला जाईल. त्यानंतर फेसबूक, गुगलसारख्या कंपन्यांकडून ही साइट बंद करण्याची कारवाई केली जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ambabai Temple Trust Files Complaint Over Online Fraud Targeting Devotees

Web Summary : Ambabai temple authorities reported AI-generated ads defrauding devotees to cybercrime police. Scammers used fake videos requesting donations to offer saris to the deity. Investigation underway to find creators and shut down fraudulent sites.