शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शक्तिपीठ महामार्गाचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार, रद्द केल्याचे लेखी पत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:43 IST

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्ग करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने सोमवारी ...

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्ग करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने सोमवारी केला. राज्य सरकार शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचे लेखी पत्र काढत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणाही खासदार शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आली.शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी नुकतीच संघर्ष समितीची स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या वतीने रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. यावेळी पवार यांनी हा महामार्ग थांबवण्यात आल्याचे सांगितले. तसे लेखी पत्र देण्याची मागणी समितीने केली होती. ते न मिळाल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार सकाळी १० नंतर जिल्हाधिकारी कार्यायलयासमोर शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान खासदार शाहू छत्रपती यांनीही आदोलनाच्या ठिकाणी पाठिंबा दिला. हा महामार्ग रद्द केल्याचे पत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आमदार ऋुतुराज पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनीही आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. जिल्हाधिकाऱ्यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी मच्छिंद्र मुगडे, शिवाजी मगदुम, गिरीश फोंडे, सम्राट मोरे, सचिन साळोखे, विजय पोवार, डॉ. मधुकर बाचूळकर, माणिक मंडलिक, वसंतराव मुळीक, प्राचार्य महादेव नरके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गagitationआंदोलन