शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार, कोल्हापुरात राज्यस्तरीय पेन्शन मेळाव्यात निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:49 IST

राज्यभरातून मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित

कोल्हापूर : राज्यातील २६ हजार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू आहे. तो जिंकण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार कोल्हापुरात रविवारी राज्यस्तरीय पेन्शन मेळाव्यात करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार जयंत आसगावकर होते. जिल्हा शाळा कृती समिती आणि जुनी पेन्शन योजना समन्वय समितीतर्फे हा मेळावा झाला.आमदार आसगावकर म्हणाले, विधिमंडळ सभागृहात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन देण्याची घोषणा केली. मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचा अध्यादेश निघाला, पण शिक्षकांना पेन्शन देण्यास सरकारची उदासीन भूमिका आहे. शिक्षण क्षेत्राकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. १० जुलै २०२० चा अध्यादेश रद्द केला नसता तर पेन्शन कधीच मिळाली नसती. शिक्षकांना नेमणुकीच्या दिनांकापासून ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. फॅमिली पेन्शनचा प्रस्ताव मान्य केला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जाईल.सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथील पेन्शनबाबत मूळ याचिकाकर्ते प्रदीप महल्ले म्हणाले, सरकारने जुन्या पेन्शनसाठी आखलेल्या धोरणाभोवती फिरत चाललो आहोत. त्यामुळे गेल्या १३ वर्षांपासून जुन्या पेन्शनचा प्रश्न प्रलंबित आहे. २०१९ नंतर आमदार आसगावकर, आमदार सुधीर तांबे यांच्यासह इतर आमदारांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने आपला दावा न्यायालयात टिकून आहे. दोन्ही सभागृहांत २६ हजार कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचा निर्णय होऊन देखील त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकली नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPensionनिवृत्ती वेतनagitationआंदोलन