शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूऐवजी लिंगायत धर्म नोंद करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लिंगायत धर्माचा दर्जा मिळविण्यासाठी आता नव्याने रणशिंग फुंकण्याचा निर्धार सोमवारी येथे करण्यात आला. जनगणनेवेळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लिंगायत धर्माचा दर्जा मिळविण्यासाठी आता नव्याने रणशिंग फुंकण्याचा निर्धार सोमवारी येथे करण्यात आला. जनगणनेवेळी हिंदूऐवजी केवळ लिंगायत धर्म अशीच नोंद करण्याचा निर्णयही यावेळी झाला.

शुक्रवारी (दि. ५) जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील दिशा ठरविली जाणार आहे. यावेळी दिशाभूल करणाऱ्यांचा समाचार घेतला जाणार आहे. ‘जनगणना २०२१ लिंगायत समाजाची भूमिका’ या विषयासंदर्भात दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि बसव केंद्र कोल्हापूरच्यावतीने ही बैठक झाली. यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे शंकर गुडस, शरण परूशेट्टी, राजाभाऊ शिरगुप्पे, सरलाताई पाटील, राजशेखर तंबाखे, बाबूराव तारळी प्रमुख उपस्थित होते.

शंकर गुडस म्हणाले, समाजातील मुलांना ९५ टक्के गुण मिळवूनही पुढील वर्षात प्रवेश मिळत नाही, हे वास्तव आहे. समाजाच्या अडचणीमध्ये भरच पडत आहे. यामुळे लिंगायत धर्मासाठीचे आंदोलन तीव्र करावे लागणार आहे. आता नाही तर कधीच नाही, अशी स्थिती आहे. कोल्हापुरातील समाजाने जागातिक लिंगायत महासंघाच्या माध्यमातून नव्या जोमाने लढा सुरू केल्यास दहा हत्तींचे बळ मिळेल.

शरण परुशेट्टी यांनी प्रत्येक गावातील लोकांमध्ये लिंगायत धर्माच्या मागणीसंदर्भात जनजागृती करावी, एकजुटीने लढा दिल्यास नक्कीच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. बी. एम. पाटील यांनी, लिंगायत धर्माचा दर्जा का मिळावा, याची माहिती दिली.

राजा शिरगुप्पे म्हणाले, ८०० वर्षांपूर्वी बसवाण्णा यांनी माणसांमध्ये माणूसपण रुजवले. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र, अमूलाग्र बदल झाले असून मूठभर लोक स्वार्थ साधत आहेत. त्यामुळे पुन्हा बसवाण्णांचे विचार समाजात रुजवण्याची वेळ आली आहे.

यावेळी राजशेखर तंबाके, बाबूराव तारळी, मिलिंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

चौकट

सरलाताई पाटील म्हणाल्या, काही शक्ती लिंगायत धर्माच्या आंदोलनात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. शनिवारी सकाळी १० वाजता याच ठिकाणी जिल्ह्यातील प्रमुख सदस्यांचा मेळावा आणि जागतिक लिंगायत महासंघाच्या शाखेची स्थापना केली जाईल. आंदोलनाचे नव्याने रणशिंग फुंकले जाईल.

फोटो : ०१०२२०२१ कोल लिंगायत समाज न्यूज

ओळी : कोल्हापुरातील चित्रदुर्ग मठामध्ये लिंगायत समाजाची बैठक झाली. यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे शंकर गुड्स यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शरण परुशेट्टी, राजाभाऊ शिरगुप्पे, सरलाताई पाटील आदी उपस्थित होते.