kmc-पतसंस्थेला देसाई यांचे नाव दिल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:30 AM2019-09-28T11:30:11+5:302019-09-28T11:33:09+5:30

महानगरपालिका सेवक पतसंस्थेला कामगार नेते रमेश देसाई यांचे नाव देण्याचा मुद्दा संस्थेच्या वार्षिक सभेत चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. या मुद्याला विरोध करण्याची तयारी विरोधी गटाच्या सदस्यांनी केली असून, रविवारी होणाऱ्या सभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. देसाई यांच्यासारख्या भ्रष्ट आणि काळी कारकिर्द असलेल्या व्यक्तीचे नाव दिले, तर आंदोलन केले जाईल, तसेच न्यायालयातही धाव घेतली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Desai's name was given to Patsanstha for agitation | kmc-पतसंस्थेला देसाई यांचे नाव दिल्यास आंदोलन

kmc-पतसंस्थेला देसाई यांचे नाव दिल्यास आंदोलन

Next
ठळक मुद्देपतसंस्थेला देसाई यांचे नाव दिल्यास आंदोलनमहापालिका कर्मचाऱ्यांचा इशारा : सभेत गोंधळ होण्याची शक्यता

कोल्हापूर : महानगरपालिका सेवक पतसंस्थेला कामगार नेते रमेश देसाई यांचे नाव देण्याचा मुद्दा संस्थेच्या वार्षिक सभेत चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. या मुद्याला विरोध करण्याची तयारी विरोधी गटाच्या सदस्यांनी केली असून, रविवारी होणाऱ्या सभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. देसाई यांच्यासारख्या भ्रष्ट आणि काळी कारकिर्द असलेल्या व्यक्तीचे नाव दिले, तर आंदोलन केले जाईल, तसेच न्यायालयातही धाव घेतली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

संस्थेचे सभासद सुरेश सूर्यवंशी, रवि आयरे, चंद्रकांत रामाणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत रमेश देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. देसाई यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याशी असलेले आमचे भांडण संपले होते. मरणोत्तर त्यांची बदनामी करण्याचाही आमचा हेतू नव्हता; मात्र त्यांची पिलावळ अजूनही अशा भ्रष्ट माणसाचा उदोउदो करून त्यांचे नाव पतसंस्थेला देण्याचा घाट घालत आहे, म्हणूनच देसाई यांची भ्रष्ट कारकिर्द पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांसमोर आणावी लागत असल्याचे रामाणे यांनी सांगितले.

देसाई संघटनेचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक बेकायदेशीर कामे केली आहेत, असे सांगून रामाणे म्हणाले की, कर्मचाºयांवरील विमा पॉलिसीचे काम त्यांच्या मुलाला देण्यात आले. प्रत्येकवर्षी दिवाळीचे साहित्य वाटपाचा ठेकाही त्यालाच देण्यात येतो. संघटनेच्या तसेच पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली. त्यांची दहशत असल्यामुळे कर्मचारी विरोधात बोलत नसत; परंतु आता मात्र त्यांच्यातील असंतोष उफाळून येत आहे.

पाचवा वेतन आयोग फक्त २७ जणांना

महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग लागू करून घेण्याऐवजी रमेश देसाई यांनी तो मोजक्या २७ जणांनाच लागू करून घेतला. त्याच्या फरकाचे ११ लाख ८० हजार रुपये या २७ जणांना मिळणार होते; परंतु देसाई यांनी सक्तीने सर्वांची संमती घेऊन फरकाची रक्कम स्वत:च घेतली, असा गंभीर आरोप सुरेश सूर्यवंशी यांनी केला.

 

Web Title: Desai's name was given to Patsanstha for agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.