शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दीड लाख कुटुंबांना ‘डिपॉझिट फ्री गॅस’

By admin | Updated: March 2, 2016 00:44 IST

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे : अर्थसंकल्प तरतुदीचा जिल्ह्याला फायदा

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ८३७ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना विनाठेव गॅसकनेक्शन देण्यास गती मिळणार आहे. विनाठेव गॅसचे कनेक्शन देण्यास राज्य शासनाने या अगोदरच सुरुवात केली आहे. विनाठेव कनेक्शन मिळाले तरी शेगडीसाठी संबंधित कुटुंबांना पैसे मोजावे लागतात. याशिवाय भरलेले सिलिंडर घेण्यासाठी प्रत्येकवेळी मोजावे लागणारे ५४७ रुपयांची जुळवाजुळव करताना गरीब कुटुंंबांची आर्थिक ओढाताण होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात घरातील प्रमुख महिलेच्या नावे एलपीजी गॅस कनेक्शन देण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. गरिबांना सवलतीमध्ये गॅस देण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीच्या अंमलबजावणीचे सविस्तर आदेश आलेले नाहीत. परंतु, जिल्हा पुरवठा प्रशासन तयारीला लागले आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची तालुकानिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. ठेव न घेता गॅस सिलिंडर देण्याच्या योजनेला गती दिली जात आहे.चुलीच्या धुरामुळे आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे सवलतीमध्ये गॅस सिलिंडर घ्या, असे आवाहन गॅस एजन्सीच्या माध्यमातून केले जात आहे. केरोसीनमुक्त (रॉकेल) गाव संकल्पनेतून अनेक गावांतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना कनेक्शननंतर शेगडी खरेदीसाठी दानशूर व्यक्तींतर्फे आर्थिक मदत दिली जात आहे. गरिबांना गॅस कनेक्शनसाठी केंद्राचीही मदत होणार आहे. दरम्यान, सध्या एका घरगुती सिलिंडरसाठी ८५ रुपये अनुदान आहे. मात्र, पहिल्यांदा पूर्ण ५४७ रुपये भरून सिलिंडर घेतल्यानंतर अनुदान नंतर बँकेतील खात्यावर जमा होते. त्यामुळे सवलतीमध्ये कनेक्शन मिळाल्यानंतर प्रत्येकवेळी भरलेले सिलिंडर घेण्यासाठी पैसे गोळा करताना संबंधित कुटुंबाची आर्थिक ओढाताण होणार आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी गॅस सिलिंडरसाठी मोजाव्या लागणाऱ्या पैशांत सवलत मिळावी, अशी मागणी होत आहे. राज्य शासनाची दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी ‘डिपॉझीट फ्री गॅस कनेक्शन’ ही योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यातून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना विनाठेव गॅस कनेक्शन दिले जात आहे. केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पातील गॅससंंबंधीच्या तरतुदीनुसार शासनाकडून सूचना आल्यानंतर अंमलबजावणी केली जाईल.- विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारीसर्वाधिक कागल तालुक्यात..सवलतीमध्ये गॅस मिळविण्यास पात्र असलेले तालुकानिहाय दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या अशी : करवीर - ११९५१, कागल - १४६८३, पन्हाळा - १४६१८, शाहूवाडी - ९७७९, राधानगरी - १३६०३, गगनबावडा - ९२६, भुदरगड - ८६२०, गडहिंग्लज - ९०६८, चंदगड - ७८७३, आजरा - ५००४, शिरोळ - १३६०४, हातकणंगले - १७५१६, इचलकरंजी शहर - ११४९४, कोल्हापूर शहर - ९०९८.