शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हद्दपार संजय तेलनाडे राजकीय कार्यक्रमात, व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिस दलात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 16:34 IST

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना एस. टी. सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे याने राजकीय कार्यक्रमात भाषण करण्यासह ...

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना एस. टी. सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे याने राजकीय कार्यक्रमात भाषण करण्यासह अन्य ठिकाणी उपस्थिती लावल्याने शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.डबल मोक्का कारवाईतून जामिनावर बाहेर असलेल्या तेलनाडे याच्यासह टोळीला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. ४) न्यायालयात एका गंभीर गुन्ह्याच्या खटल्यात हजर राहण्यासाठी तेलनाडे याला समन्स देण्यात आले होते. खटल्यातील साक्ष देऊन हद्दपारीच्या ठिकाणी न जाता तेलनाडे याने इचलकरंजी शहर काँग्रेस समिती येथे सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावत भाषण केले. त्यानंतर महापालिकेतही तो गेला होता. एका राजकीय नेत्याच्या इन्स्टाग्राम रिल्सवर त्याचा व्हिडीओ प्रसारित झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. याबाबतची माहिती घेऊन गावभाग पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलिसांना पत्र दिले.दरम्यान, हद्दपारीची कारवाई केली असतानाही त्याने कार्यक्रमास हजेरी लावल्याचे समजताच शिवाजीनगर पोलिसांनी पथकासह त्या ठिकाणी धाव घेतली असता तेलनाडे निघून गेला होता, असे पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रकाश अशोक पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण