शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

डेंग्यूचा डंख घातक, लागलीच चाचणी करून घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 17:20 IST

dengue Health Kolhapur : अतिवृष्टी, महापूर यामुळे शहरात सर्वत्र चिखल साचून दुर्गंधी पसरली आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी साचून डबकी तयार झाली आहेत. डासाचे साम्राज्य वाढून डेंग्यूचा धोका वाढला आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने अंगात साधा ताप जरी असला तरी तो अंगावर काढणे, दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

ठळक मुद्देडेंग्यूचा डंख घातक, लागलीच चाचणी करून घ्या !डासांपासून सावध रहा 

कोल्हापूर : अतिवृष्टी, महापूर यामुळे शहरात सर्वत्र चिखल साचून दुर्गंधी पसरली आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी साचून डबकी तयार झाली आहेत. डासाचे साम्राज्य वाढून डेंग्यूचा धोका वाढला आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने अंगात साधा ताप जरी असला तरी तो अंगावर काढणे, दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.गेल्या दीड वर्षापासून शहरवासीयांचे आरोग्य बिघडलेले आहे. कोरोनाने नागरिकांना हैराण केले. त्याचा मुकाबला करता करता नाकीदम आला असताना आता परत अतिवृष्टी, महापुराने आजार आणले आहेत.

गॅस्ट्रो, पोटाचे विकास, डेंग्यू, चिकुनगुनिया, यासारखे गंभीर आजारही सतावत आहेत. कोल्हापूर शहरात चिकुनगुनिया, डेंग्यूचे रोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांकडे असे रुग्ण उपचारासाठी येत असल्याने रुग्णांचा आकडा मोठा आहे.सर्वेक्षण थांबलेकोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच अतिवृष्टी व महापूर आला. त्यामुळे गेल्या आठ-दहा दिवस महापालिका यंत्रणात त्यात व्यस्त होती. पूर ओसरल्यानंतर आरोग्य सविधा देण्यात यंत्रणा गुंतली आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनियाचे सर्वेक्षणच थांबले आहे. त्यामुळे शहरात किती रुग्ण आहेत याचा नेमका अंदाज नाही.सांधेदुखी, ताप व थंडी वाजून येतेडेंग्यू व चिकुनगुनियामुळे मनगट, घोटा, गुडगा, खांदे अशा सांध्यांमध्ये खूप वेदना होतात. ताप येतो. थंडी वाजून येते. तांबड्या व पांढऱ्या पेशी कमी होतात. प्लेटलेट कमी झाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे उचित ठरते.डासांपासून सावध रहा अतिवृष्टीमुळे घराच्या परिसरात चिखल, सांडपाणी साचलेले आहे. टायर्स, नारळाची बेल्टी यामध्ये पाणी साचून पाणी साचत आहे. परिसर अद्याप स्वच्छ व कोरडा झालेला नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात आळी घालतात. त्यामुळे घरातील फ्रीज, कुंड्या, प्लेट यातील साचणाऱ्या पाणीची विल्हेवाट लावली पाहिजे. डास होणार नाहीत, चावणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे.कोणती चाचणी करून घ्यावीडेग्यू व चिकुनगुनिया झाला आहे का हे पाहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने सीबीसी, युरिन, ब्लड फॉर मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया या चाचणी करुन घेणे हिताचे ठरते. काही अपवादात्मक परिस्थितीत अँटिजेन टेस्टसुध्दा करावी. कारण कोरोना संसर्गसुध्दा झालेला असू शकतो.ही फळे भरपूर खा शरीरातील प्लेटलेटस् कमी झाली असल्याचे तपासणी अंती लक्षात येताच वैद्यकीय उपचाराबरोबरच किवी, ड्रॅगन, पपई, डाळिंब अशी फळे भरपूर खाल्ली पाहिजेत. प्लेटलेटस् वाढण्यात ही फळे महत्त्वाची भूमिका बजावतात.

डेग्यू व चिकुनगुनियाची लक्षणे असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला डोळा, नाक, कान, तोंड अशा जिथे भोक आहे त्याठिकाणाहून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याआधी योग्यवेळी योग्य तपासण्या करून घेणे रुग्णाच्या हिताचे ठरते.-डॉ. विलास महाजनमाजी अध्यक्ष, जनरल प्रॅक्टिशनर्स असो.

टॅग्स :dengueडेंग्यूMuncipal Corporationनगर पालिकाHealthआरोग्यkolhapurकोल्हापूर