गडहिंग्लजला आपत्ती व्यवस्थापन विभागाची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:23+5:302021-06-09T04:30:23+5:30

येथील पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे हिरण्यकेशी नदीपात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. पावसाळ्यातील संभाव्य ...

Demonstrations by the Disaster Management Department at Gadhinglaj | गडहिंग्लजला आपत्ती व्यवस्थापन विभागाची प्रात्यक्षिके

गडहिंग्लजला आपत्ती व्यवस्थापन विभागाची प्रात्यक्षिके

येथील पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे हिरण्यकेशी नदीपात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली.

पावसाळ्यातील संभाव्य पूरपरिस्थितीच्या काळात पूरबाधित कुटुंबांना स्थलांतरित करता यावे तसेच पुरात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रबर यांत्रिक बोट सज्ज ठेवण्यात आली आहे.

अतिवृष्टी आणि महापुराचा सामना करण्यासाठी विभागाकडील यांत्रिक बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, दोर, मेगाफोन, गळ, टॉर्च, वुडकटर, स्टील कटर, ड्रील मशीन, आग निवारक यंत्रे, शिडी, तराफा, अ‍ॅस्का इमर्जन्सी लाईट, टेंट, फायर फायटर, रुग्णवाहिका आदी साधने व उपकरणे सुस्थितीत ठेवण्यात आली आहेत.

आपत्ती विभागाच्या महादेव बारामती आणि पास रेस्क्यू फोर्टाचे राहुल कारंडे व त्यांच्या टीमने प्रात्यक्षिके घेतली. याकामी आपत्ती व्यवस्थापक रवीनंदन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हिरण्यकेशी नदीपात्रात प्रात्यक्षिके सादर केली.

क्रमांक : ०७०६२०२१-गड-०८

Web Title: Demonstrations by the Disaster Management Department at Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.