शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 18:39 IST

‘जुन्या कामांना जीएसटीमधील फरक मिळालाच पाहिजे’, ‘थकीत बिले दिवाळीपूर्वी मिळाली पाहिजेत,’ अशा घोषणा देत ठेकेदारांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. डंपर, रोलर, ट्रॅक्टर, आदी बांधकाम वाहने, यंत्रसामग्री घेऊन रोड काँट्रॅक्टर असोसिएशनच्या (आरसीए) नेतृत्वाखाली त्यांनी मोर्चा काढला.

ठळक मुद्दे थकीत बिले दिवाळीपूर्वी मिळाली पाहिजेत डंपर, ट्रॅक्टरसमवेत सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर मोर्चागेल्या चार महिन्यांपासून ‘आरसीए’ आंदोलन सुरू मागण्यांच्या घोषणा देत ठेकेदारांनी परिसर दणाणून सोडलाआंदोलनाची व्याप्ती वाढविणार : अरुण पाटील जिल्ह्यातील २०० कोटींची बिले थकीत

 कोल्हापूर, 5 : ‘जुन्या कामांना जीएसटीमधील फरक मिळालाच पाहिजे’, ‘थकीत बिले दिवाळीपूर्वी मिळाली पाहिजेत,’ अशा घोषणा देत ठेकेदारांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. डंपर, रोलर, ट्रॅक्टर, आदी बांधकाम वाहने, यंत्रसामग्री घेऊन रोड काँट्रॅक्टर असोसिएशनच्या (आरसीए) नेतृत्वाखाली त्यांनी मोर्चा काढला.

विविध मागण्यांसाठी गेल्या चार महिन्यांपासून ‘आरसीए’ने आंदोलन सुरू केले आहे. यातील पुढील टप्पा म्हणून गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदार आणि त्यांच्या कामगारांनी मोर्चा काढून निदर्शने केली.

आरटीओ कार्यालयापासून डंपर, रोलर, ट्रॅक्टर, आदी बांधकाम वाहने, यंत्रसामग्रीसह ठेकेदारांनी मोर्चाला सुरुवात केली. ताराबाई पार्क येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर त्यांनी ही वाहने लावली. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठेकेदारांनी निदर्शने केली. यात त्यांनी विविध मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

येथे ‘आरसीए’चे अध्यक्ष अरुण पाटील यांनी मार्गदर्शन केले. यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे यांना निवेदन दिले. यावर साळुंखे यांनी दिवाळीपूर्वी थकीत बिले देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले. आंदोलनात ‘आरसीए’चे उपाध्यक्ष डी. वाय. भोसले, राजेश व्हटकर, मयूर भोसले, सचिन कोळी, रवी कागवाडे, सचिन लिंग्रस, विजय भोसले, आदी सहभागी झाले होते.

आंदोलनाची व्याप्ती वाढविणारशासनाने निविदा शर्तींनुसार प्रत्येक महिन्याला एक बिल (देयक) देणे बंधनकारक आहे. मात्र, शासनाकडून या निविदाशर्तींचे पालन झालेले नसल्याचे ‘आरसीए’चे अध्यक्ष अरुण पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, गेल्या वर्षभरात शासनाने बिले दिलेली नाहीत. त्यामुळे ठेकेदारांची बँकांची कर्जे, कामगारांचे पगार थकीत आहेत. कामे थांबली आहेत. शासनाने बिले अदा करावीत, यासाठी आम्ही गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन पुकारले आहे. मात्र, त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. थकीत बिले दिवाळीपूर्वी अदा करण्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही न केल्यास निविदांवरील बहिष्कार कायम ठेवत आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल.

जिल्ह्यातील २०० कोटींची बिले थकीतमहाराष्ट्रातील ठेकेदारांची ३६०० कोटींची, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांची २०० कोटींची बिले थकीत असल्याचे ‘आरसीए’चे उपाध्यक्ष डी. वाय. भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘जीएसटी’चा फरकदेखील मिळालेला नाही. विविध क्षेत्रांत दर वाढत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने दरसूची १५ टक्क्यांनी कमी केली आहे. त्यामुळे ठेकेदारांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

मागण्या अशा* सन २०१७-१८ च्या दरसूचीमध्ये सुधारणा करावी.* थकीत बिले अदा करण्याची कार्यवाही लवकर व्हावी.* कन्यागत महापर्वकाळासाठी केलेल्या कामांची देयके पूर्णपणे लवकर द्यावीत.* ठेकेदारांच्या मागण्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस निर्णय घ्यावा.