मतदानामुळे लोकशाही मजबूत : अपर्णा मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:01+5:302021-02-05T07:08:01+5:30
शिरोळ : संविधानाने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. मतदान हा प्रत्येकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने ...

मतदानामुळे लोकशाही मजबूत : अपर्णा मोरे
शिरोळ : संविधानाने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. मतदान हा प्रत्येकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. सुशिक्षित जागरूक नागरिकाने जर योग्य व्यक्तीस मतदान केले तर गावपातळीपासून देशपातळीपर्यंत सर्वांगीण विकास होतो, असे मत तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी केले.
येथील श्री पद्माराजे विद्यालयात राष्ट्रीय मतदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार डॉ. मोरे व प्राचार्य बी. एस. कनप यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. आर. सी. नाईक यांनी लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व विषद केले. विद्यार्थी यशश्री सावंत, दीक्षा देवकारे, प्रज्ञा माळकर यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयात वकृत्व निबंध स्पर्धा तसेच रांगोळी चित्रकला प्रदर्शन पार पडले. पांडुरंग पोळ व अविनाश माने यांनी प्रदर्शनाची मांडणी केली. सूत्रसंचालन एम. एम. पाटील तर एम. एन. पाटील यांनी आभार मानले.