सातवणे तलाठी चोपडे यांची बदली करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST2021-06-24T04:17:47+5:302021-06-24T04:17:47+5:30

निवेदनात म्हटले आहे, तलाठी चोपडे या सातवणे सजामध्ये वर्षभरापूर्वी हजर झाल्या आहेत. हजर झाल्यापासून आजपर्यंत एकाही शेतक-याचे काम पूर्ण ...

Demand for transfer of Satwane Talathi Chopde | सातवणे तलाठी चोपडे यांची बदली करण्याची मागणी

सातवणे तलाठी चोपडे यांची बदली करण्याची मागणी

निवेदनात म्हटले आहे, तलाठी चोपडे या सातवणे सजामध्ये वर्षभरापूर्वी हजर झाल्या आहेत. हजर झाल्यापासून आजपर्यंत एकाही शेतक-याचे काम पूर्ण केलेले नाही. सरकारी करापोटी पैसे घेतात पण पावती देत नाहीत. फोन केला तर उचलत नाहीत, कधी सजात आल्याच तर उद्धटपणे उत्तरे देतात.

तलाठी चोपडे यांच्यामुळे हेरे सरजांम बाबतीतील प्रकरणे, खरेदी-विक्री, उत्पन्नाचे दाखले, फेरफार, कर्जप्रकरणे आदी कामे प्रलंबित आहेत. आजपर्यंत सातवणेसह केरवडे, वाळकुळी, आसगोळी, केंचेवाडी या पाच गावांतील शेतकरी, शाळकरी विद्यार्थी यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा कामचुकार तलाठी यांच्यावर कारवाई करावी व सातवणे सजात कार्यक्षम नवीन तलाठी नेमावा, अशी मागणी केली आहे.

शिष्टमंडळात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अडकूर विभाग अध्यक्ष सुरेश कुट्रे, गणपत गावडे, नामदेव पारसे, सुरेश माने, बयाप्पा पारसे, अशोक माने, जयराम मासरणकर, विशाल जाधव, अजित पाटील, संदीप पाटील, सागर पाटील आदींचा समावेश होता.

Web Title: Demand for transfer of Satwane Talathi Chopde