शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

वडगावात कोविड सेंटर पालिकेने सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST

सुहास जाधव लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : वडगाव परिसरात रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. ...

सुहास जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : वडगाव परिसरात रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, वडगावला कोविड सेंटर होण्यासाठी युद्धपातळीवर पाठपुरावा करायला हवा. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून खासगी कोविड सेंटर मात्र मोठ्या प्रमाणात सुरू होण्याच्या हालचाली सुरू आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत संवेदनशील दाखवत आमदार, खासदारांनी पाठपुरावा होण्यासाठी प्रयत्न केले. लोकसहभागातून व्यापारी असे असोसिएशन, विजयसिंह यादव प्रतिष्ठान, युवक क्रांती आघाडी अशा अनेकांनी मदतीचा हात दिला.

पालकमंत्री सतेज पाटील याच्या प्रयत्नाने मदत मिळवून दिली.या प्रश्नी तत्कालीन मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी संवेदनशीलता दाखवत पाठपुरावा केला होता. त्यामुळे हे कोविड सेंटर प्रत्यक्ष साकारले होते.

सध्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांवर लाखाहून अधिक खर्च झाला होता. मात्र, पैसे जावू दे पण जीवनदान मिळाले, अशी भावना झाली होती.

दुसऱ्या लाटेत कोविड रुग्णालये सुरू आहेत. भीतीपोटी साधी लक्षणे असणारे ही रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे जागा नाही रुग्णालय हाऊसफुल्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये सामान्य नागरिक व सेवाक्षेत्रातील अनेक जणांचा कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे खर्चाचे आकडे ऐकून हतबल झाले आहेत.

यावेळी आणखी पाच कोविड सेंटर सुरू झालेली आहेत. त्यात आणखी चारची भर पडणार आहे पण राज्यात लोकसहभागातून झाकारलेले वडगाव पालिकेचे कोविड सेंटर म्हणून ओळखले जात होते.

येथे मोफत उपचारांबरोबरच जेवण, नाष्टाची सोयही होती. त्यामुळे सामान्यांना आधार ठरलेले हे रुग्णालय होते.

पूर्वी पालिकेने दुरुस्ती केलेल्या धन्वंतरी रुग्णालयास पालिकेने कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हक्कांची जागा पालिकेने गमावली आहे तर आता जनरेट्यामुळे नवीन जागा शोधण्यासाठी चाचपणी सुरू आहे. मंगल कार्यालय किंवा डाॅ. प्रवीण हेंद्रे यांचे सध्या बंद असलेले रुग्णालय हे पर्याय पालिकेस खुले आहेत. मात्र, ही सर्व प्रक्रिया पाहता महिन्याहून अधिक कालावधी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर झपाट्याने कोरोनाची संख्या वाढत असताना सामान्यांना आधार देणारे रुग्णालय आवश्यक आहे. हे सुरू होण्यासाठी आवश्यक तेवढी गती लोकप्रतिनिधींनी घेतलेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिक धास्तावले आहेत.