अल्पसंख्याक शिष्यवृत्तीमधील जाचक अटी रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST2021-02-14T04:23:49+5:302021-02-14T04:23:49+5:30
अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अल्पसंख्याक दाखल्याची जाचक अट रद्द करावी, अशी मागणी भारतीय जैन संघटनेने येथील तहसीलदार दिनेश पारगे यांच्याकडे निवेदनातून ...

अल्पसंख्याक शिष्यवृत्तीमधील जाचक अटी रद्द करण्याची मागणी
अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अल्पसंख्याक दाखल्याची जाचक अट रद्द करावी, अशी मागणी भारतीय जैन संघटनेने येथील तहसीलदार दिनेश पारगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे, केंद्रातर्फे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक व पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती देते. त्यासाठी अल्पसंख्याक असल्याच्या दाखल्याची मागणी करण्यात आली आहे.
परंतु सरकारी अधिकारी असा दाखला देत नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शाळा सोडल्याचा दाखला आणि स्वयंघोषित शपथपत्र घेऊन ही शिष्यवृत्ती देण्यात यावी.
शिष्टमंडळात अनिल उंदरे, बिना शहा, सुभाष पाटील, नागराज पाच्छे, महावीर दसूरकर, प्रमोद चेटके, प्रमोद कमते यांचा समावेश होता.