शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मागणी साडेतेरा कोटींची; मंजूर केवळ चारच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 1:14 AM

कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सीमाभागातील रुग्णांचा आधारवड म्हणून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडे (सीपीआर)कडे पाहिले जाते; पण अपुऱ्या निधीअभावी या ‘सीपीआर’चे आरोग्य बिघडले आहे.

ठळक मुद्देहाती अवघे दीड कोटी : रुग्णसेवेचे तीनतेरा; मंजुरीनंतरही औषधांसाठी वर्षभर प्रतीक्षाच

तानाजी पोवार ।कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालय प्रशासनाकडे अपुरी यंत्रसामग्री असल्याने रुग्णसेवेवर मर्यादा पडत आहेत. शासनाकडून औषध व यंत्रसामग्रीसाठी अत्यल्प निधी मिळत असल्याने रुग्णावर उपचार करताना खर्चासाठी कसरत करावी लागत आहे. २०१८-१९ मध्ये सहा कोटी ३४ लाख रुपये निधी शासनाकडून मिळाला; तर चालू वर्षात १३ कोटी ५८ लाखांची मागणी असताना शासनाकडून अवघे चार कोटी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यांपैकी दीड कोटी रुपये नुकतेच मिळाले आहेत.

कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सीमाभागातील रुग्णांचा आधारवड म्हणून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडे (सीपीआर)कडे पाहिले जाते; पण अपुऱ्या निधीअभावी या ‘सीपीआर’चे आरोग्य बिघडले आहे. प्रत्येक वेळी निधी नसल्याने यंत्रसामग्री नाही, निधी नसल्याने औषधे नाहीत, निधी नसल्याने यंत्रसामग्री दुरुस्तीअभावी बंद अशी वारंवार कारणे प्रशासनाकडून पुढे येऊ लागल्याने नागरिकांतून संतापाची लाट उमटत आहे. सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार नव्हे, पण चांगली सुविधा मिळावी अशी ‘सीपीआर’कडून अपेक्षा असताना निधीच्या नावाखाली येथील रुग्णसेवेचे तीनतेरा वाजू लागले आहेत. राज्यातील सरकारी रुग्णालयांना हाफकिन इन्स्टिट्यूट या कंपनीकडून औषधे पुरविली जातात.

‘सीपीआर’मध्ये २०१८-१९ मध्ये दोन कोटी ६० लाख ५७ हजारांची, तर २०१९-२० मध्ये एक कोटी २४ लाख ६४ हजार रुपयांची औषधे हाफकिन कंपनीकडून पुरविली गेली आहेत. २०१९-२० साठी फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुमारे एक कोटी ४५ लाखांची मागणी असताना त्यापैकी फक्त ८० लाख रुपये निधी मिळाला आहे. अपुºया निधीमुळे प्रशासनाला रुग्णसुविधा पुरविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ‘सीपीआर’चे आरोग्य बिघडण्याच्या मार्गावर आहे.

साडेसहा कोटींच्या यंत्रसामग्रीची प्रतीक्षाच!सध्या सीपीआर, शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालय प्रशासनाकडे अपुरी यंत्रसामग्री असल्याने रुग्णसेवेवर मर्यादा पडत आहेत. या यंत्रसामग्रीसाठी सुमारे सहा कोटी ३० लाख रुपयांची विविध विभागांची यंत्रसामग्री मंजूर झाली आहे. त्याप्रमाणे यंत्रसामग्रीची मागणीही केली आहे; पण त्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करण्याची प्रशासनावर वेळ आली आहे. विशेष म्हणजे, व्हेंटिलेटर आणि भुलीची यंत्रसामग्री गेली सहा महिने प्रतीक्षेतच आहे. 

‘हार्ट’ विभाग बेस्टच...सीपीआर रुग्णालयातील हार्ट विभागातील यंत्रसामग्री कालबाह्ण झाली असली तरीही याच यंत्रसामग्रीवर अ‍ॅँजिओग्राफी, अ‍ॅँजिओप्लास्टीसह इतर लहानमोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. २०१८-१९ मध्ये पश्चिम महाराष्टÑात सर्वांत जास्त म्हणजेच १२५० शस्त्रक्रिया ‘सीपीआर’च्या हार्ट विभागात झाल्या आहेत.

वर्षभरात देणगी स्वरूपात मिळालेला निधी व यंत्रसामग्रीडायलेसिस युनिट - रोटरी क्लब आॅफ कोल्हापूरकाडिएक्स -इंडोकाउंट कंपनीआमदार अमल महाडिक - ४३ लाख रुपयांची वैद्यकीय साधनेआमदार राजेश क्षीरसागर- १ कोटी रुपये आमदार निधी मंजूर

हॉस्पिटलसाठी मिळालेला निधी१ कोटी २३ लाख ७३ हजारकॉलेजसाठी निधी : २८ लाख (जून २०१८)नियोजन मंडळ : ३ कोटी ३५ लाख ८६ हजार५२ लाख ५४ हजार (फेब्रुवारी २०१९ यंत्रसामग्री खरेदीसाठी)

नेहमी लागणारी औषध दरमहा मिळतात मागणीश्वान रेबीज १००० ९०००सर्पदंश १५०० (साठा भरपूर शिल्लक)सलाईन (आरएल) १० हजार ३० हजार

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूरfundsनिधी