शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

महाशिवरात्रीनिमित्त शाबू, वरी, राजगिऱ्यासह लिंबूला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:20 AM

कडाक्याची थंडी कमी होऊन उष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे; त्यामुळे आता थंडगार काकडी, लिंबंूना ग्राहकांची मागणी वाढली आहे. रविवारच्या आठवडी बाजारात काकडीची आवक वाढली आहे. ती २० रुपये पावशेर होती; त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे, तर भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, महाशिवरात्री सण तोंडावर आल्याने शाबू, वरी, राजगिरा व शेंगदाण्यालाही मागणी वाढली.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीनिमित्त शाबू, वरी, राजगिऱ्यासह लिंबूला मागणीबाजारात काकडीची आवक; भाजी वाढली

कोल्हापूर : कडाक्याची थंडी कमी होऊन उष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे; त्यामुळे आता थंडगार काकडी, लिंबंूना ग्राहकांची मागणी वाढली आहे. रविवारच्या आठवडी बाजारात काकडीची आवक वाढली आहे. ती २० रुपये पावशेर होती; त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे, तर भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, महाशिवरात्री सण तोंडावर आल्याने शाबू, वरी, राजगिरा व शेंगदाण्यालाही मागणी वाढली.कोल्हापूर शहरात विशेषत: लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारासह कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, गंगावेशीतील पाडळकर मार्केट, आदी बाजारांत शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातून ग्राहक खरेदीसाठी येतात. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात भाज्यांच्या दरात वाढ झाली असली, तरीही भाज्यांची मागणी वाढली आहे.

किरकोळ बाजारात कोबीचा गड्डा १0 रुपये, तर घाऊक बाजारात तो साडेसात रुपये असा होता. वांगी १0 रुपये, वरणा, दोडका ३० रुपये किलो, भेंडी ४० रुपये किलो, दोडका, काकडी ८० रुपये किलो असा दर होता. या दरात वाढ झाली आहे; पण घेवडा ४० रुपये, फ्लॉवर पाच ते सात रुपयांच्या घरात, तर मेथीची पेंढी पाच रुपये, पालक पेंढी तीन रुपये असा दर होता. यांच्या दरात घसरण झाली आहे.याचबरोबर आता फेब्रुवारी संपत आल्याने उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे; त्यामुळे विशेषत: लिंबू, काकडीला मागणी वाढली आहे. रसरशीत लिंबूचा दर दोन ते अडीच रुपये असा होता. लिंबूची आवक वाढली आहे. ते घाऊक बाजारात ५५० रुपये चुमडे होते. तसेच द्राक्षे ३० रुपये किलो होती; मात्र सफरचंदाचे दर स्थिर होते. कलिंगड २० रुपये होते, तर हापूस आंब्यांची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. आंब्यांचा बॉक्स ५०० रुपये असा होता.महाशिवरात्रीनिमित्त शाबू ५६ रुपयांवरून ६० रुपये किलो, वरी व राजगिरा ८० रुपये किलो, तर शेंगदाणे ९० रुपयांपासून ते १०० रुपयांच्या घरात होता. त्याला ग्राहकांची मागणी होती. हरभरा डाळ ७०, मूगडाळ व उडीद डाळ ८८ रुपये, तूरडाळ ८४ रुपये, तसेच शेंगतेल १२५ रुपये, सरकी तेल ९० रुपये व सुके खोबरे २०० रुपये प्रतिकिलो होते. रत्नागिरी तांदूळ ४४ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत, तर आंबेमोहर ७६ रुपये, बासमती ४० रुपयांपासून ६८ रुपये होता.साखर वाढली...साखरेच्या किमान दरात केंद्र सरकारने प्रतिक्विंटल वाढ केली आहे. यापूर्वी तो २९०० रुपये होता, तो आज ३१०० रुपये झाला; त्यामुळे किरकोळ बाजारात साखरेच्या प्रतिकिलो दरात आपोआपच वाढ झाली. ती ३४ रुपयांवरून ३६ रुपये झाली असल्याचे व्यापाºयांतून सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीMarketबाजारkolhapurकोल्हापूर