चंदगड :ताम्रपर्णी नदीतील पाणी मळीमिश्रित होवून मासे व जलचर प्राणी मृत्यूमुखी पडत आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंदगड ग्राहक सरंक्षण समितीतर्फे तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.दौलत (अथर्व) कारखान्याच्या धुरांडीतून निघणाºया मसवेपासून (राखेपासून) नागरिकांच्या डोळ्याला परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे या सर्व गंभीर विषयांची चौकशी करून दोषींवर त्वरीत कारवाई करावी.निवेदनावर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज रावराणे, निलिमा कोदाळकर राजू किरमटे, रायमन फर्नांडिस, राजाराम पाटील, मारूती हदगल, तुकाराम पाटील, बापू मटकर, शशिकांत मातोंडकर आदीच्या स्वाक्षºया आहेत.
ताम्रपर्णी नदीतील मासे मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 15:29 IST
pollution, river, kolhapur- ताम्रपर्णी नदीतील पाणी मळीमिश्रित होवून मासे व जलचर प्राणी मृत्यूमुखी पडत आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंदगड ग्राहक सरंक्षण समितीतर्फे तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
ताम्रपर्णी नदीतील मासे मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी
ठळक मुद्देताम्रपर्णी नदीतील मासे मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणीप्रांतग्राहक संरक्षणचे तहसिलदारांना निवेदन