गडहिंग्लजमध्ये कृषी सेवा केंद्राची वेळ वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:44+5:302021-05-28T04:18:44+5:30

गडहिंग्लज : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील कृषी सेवा केंद्रांची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत ...

Demand for extension of time of Agricultural Service Center at Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये कृषी सेवा केंद्राची वेळ वाढविण्याची मागणी

गडहिंग्लजमध्ये कृषी सेवा केंद्राची वेळ वाढविण्याची मागणी

गडहिंग्लज : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील कृषी सेवा केंद्रांची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे केली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या भाजीपाला, दूध खरेदी-विक्री, किराणा माल व कृषीविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच मुभा देण्यात आली आहे. परंतु, खरिपाच्या तयारीसाठी कृषी साहित्य, बि-बियाणे व खते, भात, भुईमूग व कडधान्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे.

शेतीकामासाठी आवश्यक बैलजोडींची गरज आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या जनावरांचा बाजार बंद आहे. ट्रॅक्टर व्यावसायिकांनाही डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. अवजारे तयार करणारे लोहार व सुतार यांचेही व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.

शिष्टमंडळात, गडहिंग्लज तालुका कृषी निविष्ठा अध्यक्ष रवी घेज्जी, अवधूत केसरकर, मार्तंड जरळी, विजय कदम, गुरूनाथ मोरे, राजेंद्र बस्ताडे आदींचा समावेश होता.

-

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना निवेदन दिले. यावेळी रवींद्र घेज्जी, विजय कदम, मार्तंड जरळी, अवधूत केसरकर आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : २७०५२०२१-गड-०२

Web Title: Demand for extension of time of Agricultural Service Center at Gadhinglaj