शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

मराठा दाखल्यांसाठी ‘महा-ई-सेवा केंद्र’चालकांकडून लूट: शिवसेनेची कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 4:28 PM

मराठा दाखल्यांसाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून ४०० ते ५०० रुपये घेऊन समाजबांधवांची लूट केली जात आहे. त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. याची गांभीर्याने दखल न घेतल्यास शिवसेना मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा काढेल, असा इशाराही देण्यात आला.

ठळक मुद्देमराठा दाखल्यांसाठी ‘महा-ई-सेवा केंद्र’चालकांकडून लूट: शिवसेनेची कारवाईची मागणीजिल्हाधिकाऱ्यांकडून केंद्रचालकांची बैठक घेण्याचे आश्वासन

कोल्हापूर : मराठा दाखल्यांसाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून ४०० ते ५०० रुपये घेऊन समाजबांधवांची लूट केली जात आहे. त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. याची गांभीर्याने दखल न घेतल्यास शिवसेना मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा काढेल, असा इशाराही देण्यात आला.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दुपारी जिल्हाधिकारी सुभेदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.संजय पवार म्हणाले, मराठा दाखला मिळविण्यासाठी समाजबांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महा ई सेवा केंद्र चालकांकडून दाखले देण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ केला जात आहे. जेणेकरून दाखला लवकर पाहिजे असल्यास जादा पैसे घेऊन लोकांची लूट करता येऊ शकेल. केंद्र चालकांकडून तब्बल ४०० ते ५०० रुपये आकारले जात आहेत. याबाबत आपल्याकडे असंख्य तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी.ते पुढे म्हणाले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे उद्योगासाठी बिनव्याजी कर्जासाठी राष्ट्रीयकृत बॅँकातील अमराठी अधिकाऱ्यांकडून मराठा समाजबांधवांना हीन वागणूक दिली जात आहे. उलट कर्ज बुडव्यांना व टक्केवारी देणाऱ्यांना बॅँकेकडून पायघड्या घातल्या जात आहेत, हे चुकीचे आहे.यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने जादा पैसे आकारणाऱ्या केंद्र चालकांची नावे असल्यास आपल्याकडे द्यावीत असे सांगितले. तसेच लवकरच ई सेवा केंद्र चालकांची बैठक घेऊन त्यांना दाखल्यांसाठी योग्य रक्कम आकारण्यासंदर्भात सूचना केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी पाटील, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, राजू यादव, शशी बीडकर, रणजित आयरेकर, अवधूत साळोखे, आप्पा पुणेकर, दत्ताजी टिपुगडे, शुभांगी पोवार, मेघना पेडणेकर, कमल पाटील, राजू जाधव, सुनील पोवार, नरेश तुळशीकर, दिलीप जाधव, अशोक पाटील, प्रवीण पालव, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर