शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पार्ले येथील पाणंद रस्ते अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:04 IST

:पार्ले (ता. चंदगड) येथे पूर्वापार चालत आलेल्या वहिवाटीखालील पांणद रस्ते अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देपार्ले येथील पाणंद रस्ते अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईची मागणीग्रामस्थांचे तहसिलदारांना निवेदन

चंदगड :पार्ले (ता. चंदगड) येथे पूर्वापार चालत आलेल्या वहिवाटीखालील पांणद रस्ते अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.

निवेदनात, गट नं ५१/१ मधील जमिनीतून शिवारातील, वाडी, वस्तीवर जाण्या-येण्यासाठी पाणंद रस्त्याची नोंद आहे. पण, या पाणंद रस्त्यावर अतिक्रमण करून हे पाणंद अडविण्यात आले आहेत. तसेच याच जमिनीतून पार्ले गावाला पाणी पुरवठा करणारी नळपाणी योजना कार्यान्वित आहे.या नळपाणी योजनेचीही या शेतकऱ्यांनी दोन-तीन वेळा मोडतोड केली आहे. नळपाणी योजना व पाणंद रस्ते दुरूस्त करून मिळावेत, अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे पंचायत समितीकडे केली. त्यानुसार नळपाणी व रस्तेही दुरूस्ती केलेली आहेत. मात्र, गट नं. ५१/१ च्या जमीन मालकांनी जाण्या-येण्याचा गावकऱ्यांचा हक्कसंबंध डावलून व निव्वळ त्रास देण्याच्या हेतूने चंदगड न्यायालयात दावा दाखल केला आहे.गट. नं ५१/१ मध्ये झालेल्या ग्रा.पं. नोंदीच्या रस्त्याबरोबर सदर क्षेत्रातून जाणारे व अन्य पाणंद रस्ते व गावाला जोडणारे रस्ते दुरुस्त करुन मिळावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर, तंटामुक्त अध्यक्ष गोविंद गावडे, महादेव मयेकर, दत्ता फाटक, मारूती कांबळे, लक्ष्मण गावडे, जीवणू गावडे, संभाजी गावडे, विठोबा मयेकर, तुकाराम गावडे, विठ्ठल गावडे, रामू देवळी, अजय कांबळे, अशोक सुतार, विठ्ठल जानकर, शंकर मयेकर आदीसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्याआहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर