शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेकडो शिक्षकांच्या जागा खाली, शाळा मात्र देईनात जाहिराती 

By पोपट केशव पवार | Updated: January 16, 2024 14:09 IST

पै-पाहुण्यांना नोकरी देण्यासाठी संस्थाचालकांची धडपड

पोपट पवार कोल्हापूर : रिक्त पदांमुळे शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची ओरड करत ती पदे भरण्याची मागणी करणाऱ्या माध्यमिक शाळा आता भरती प्रक्रिया सुरू होऊनही पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यास दिरंगाई करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अनुदानित, अंशत: अनुदानित अशा ४५० माध्यमिक शाळांमधील पदे रिक्त असताना आतापर्यंत केवळ २५ ते ३० शाळांनीच रोस्टर तपासून जाहिराती अपलोड केल्या आहेत. रिक्त पदे असणाऱ्या खासगी अनुदानित शाळांमध्ये एका पदासाठी तीन उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच पाठविले जातील. त्यातून एकाची निवड संस्थेला करायची आहे. यामुळे संस्थाचालकांच्या पै पाहुणे, नातेवाइकांना यात संधी मिळत नसल्यानेच शाळा जाहिरात अपलोड करण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.तब्बल सात ते आठ वर्षांनंतर राज्यांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली. १६ ऑक्टोबरपासून जाहिराती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. जिल्ह्यात ४५० माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची ७५० पदे रिक्त आहेत. सोमवारपर्यंत ही मुदत होती. मात्र, आतापर्यंत केवळ ३० शाळांनीच रोस्टर तपासून जाहिराती अपलाेड करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली.

पै-पाहुण्यांना नोकरी देण्यासाठी संस्थाचालकांची धडपडखासगी अनुदानित शाळांचे संस्थाचालक पै-पाहुण्यांना नोकरी लावण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांमधून होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास ते त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. पण खासगी संस्थाचालक जवळचा व्यक्ती शिक्षक म्हणून लावण्यासाठी वर्षानुवर्षेही पदे रिक्त ठेवत आहेत.

वशिलेबाजीला लगामवशिलेबाजी, डोनेशन या गोष्टींना लगाम बसावा म्हणून शिक्षक भरती प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाने बदल केला आहे. गुणवत्ता यादीनुसार संबंधित शिक्षकांची नेमणूक होईल. पूर्वीप्रमाणे संस्थापक ठरवेल त्याच उमेदवाराला शिक्षक म्हणून मान्यता मिळणार नाही. रिक्त पदे असणाऱ्या खासगी अनुदानित शाळांमध्ये एका पदासाठी तीन उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच पाठविले जातील. त्या तिघांची मुलाखत घेऊन त्यातून एकाची निवड करण्याचा अधिकार संस्थेला असेल. पूर्वी एका पदासाठी दहा उमेदवारांना पाठविण्याचा निर्णय होता, परंतु त्यात बदल करून आता एका पदासाठी तीन उमेदवार असे समीकरण आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकSchoolशाळा