शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सीपीआरमध्ये डिस्चार्जला विलंब; पालकमंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 11:49 IST

जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची विचारपूस

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील दोन वर्षांच्या बाळाला डिस्चार्ज देतो म्हणून दिवसभर थांबवून ठेवल्याच्या प्रकाराबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांन तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कारवाईच्या सूचना दिल्या. कारवाईचा अहवाल माझ्याकडे पाठवा, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.आरोग्यमंत्री असलेल्या आबिटकर यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सीपीआरला भेट दिली. यावेळी त्यांनी जीबी सिंड्रोम आजाराने दाखल झालेल्या दोन मुलांच्या तब्येतीची चौकशी केली. याचवेळी सावरवाडी येथील एका दाम्पत्याने आपल्या मुलाला डिस्चार्ज देतो म्हणून सांगून दिवसभर दिला नसल्याचे आबिटकर यांना सांगितले. आता रात्री ९ वाजता आम्ही कसे घेऊन जाऊ अशी विचारणा केली. यावेळी आबिटकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांना संबंधितांवर कारवाईच्या सूचना केल्या. असले प्रकार अजिबात घडता कामा नये असेही ते म्हणाले.पत्रकारांशी बोलताना आबिटकर म्हणाले, मुळात हा नवा आजार नसून जुनाच आहे. तसेच संसर्गजन्य नाही. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यावर चांगले उपचार आहेत. त्या पध्दतीने राज्यभर उपचार सुरू आहेत. त्यामुळे जनतेने घाबरू नये. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. गिरीश कांबळे, डाॅ. बुद्धिराज पाटील, डॉ. अपराजित वालावलकर, बंटी सावंत यांच्यासह डाक्टर उपस्थित हाेते.

किती व्हेंटिलेटर हवेत? रविवारी नियोजन बैठकीत निर्णय घेऊहा थोरला दवाखाना आहे. या ठिकाणी उत्तम सुविधा हव्यातच. सर्वसामान्यांसाठी असलेला हा दवाखाना आहे. त्यामुळे तुम्हाला किती व्हेंटिलेटर पाहिजेत ते सांगा. रविवारी नियोजन मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊ, असे आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयPrakash abitkarप्रकाश आबिटकर