शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: काळम्मावाडी धरणातील पाणीसाठ्यात घट, पाणी टंचाई भासणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 18:57 IST

धरणातून एकूण १२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

सोळांकुर : काळम्मावाडी (ता. राधानगरी) धरणात आज ३१ जानेवारी अखेर ५६.११ टक्के म्हणजे १४.२४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत जवळपास सहा टीएमसी पाणी कमी असून खऱ्या पावसाळ्यास तब्बल पाच महिन्यांचा कालावधी असल्याने पाण्याचे सूक्ष्म नियोजन होणे आवश्यक आहे. अशी मागणी जोर धरत आहे.गतवर्षी जानेवारी- २०२२ अखेर धरणातील पाणीसाठा ७९.०७ टक्के म्हणजे २०.०७ टीएमसी इतका पाणीसाठा होता. यावर्षी ऑक्टोबरअखेर काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के (२५.४०) टीएमसीने भरले होते. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने धरणाच्या पाण्याचा साठा ऑक्टोबरमध्ये चांगला असताना केवळ तीन महिन्यात जवळपास १० टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.आज धरणाच्या जलाशयाची पातळी ६३५.५४ मीटर असून धरणाचा पाणीसाठा ४०३.३३ द.ल.घ.मी म्हणजेच ५६..११ टक्के (१४.२४) टीएमसी इतका उपलब्ध आहे. परिणामी दूधगंगा नदी काठावरील गावांना पाणी समस्या भासणार असल्याचे चित्र दिसत आहे.दूधगंगा काठावरील गावाबरोबर या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना पाणी समस्या भासणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी अशी मागणी शेतकरी व भूमिपुत्र करत आहेत. आज धरणातून विद्युत जनित्रासह दूधगंगा नदीपात्रात २५० क्युसेक्स, उजवा कालवा ४५० क्युसेक्स, तर गैबी ५०० क्युसेक्स असे एकूण १२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उर्वरित पाण्याचे सूक्ष्म नियोजन होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी