शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गुळाच्या दरात घसरण, कोल्हापुरात शेतकऱ्यांनी सौदे पाडले बंद

By राजाराम लोंढे | Updated: November 22, 2022 18:42 IST

कर्नाटकी गुळामुळे दर घसरल्याचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाच्या दरात घसरण झाल्याने आज, मंगळवारी आक्रमक शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले. समितीमध्ये येणाऱ्या कर्नाटकी गुळामुळे दर घसरल्याचा आरोप करत हा गूळ बंद करा व गुळाला किमान प्रतिक्विंटल ३७०० रुपये दर मिळाला पाहिजे, ही मागणी लावून धरली.कोल्हापूर जिल्ह्यात यंदा गुऱ्हाळघरे सुरू होऊन दीड महिने झाले; मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये कमालीची खदखद होती. मंगळवारी बॉक्समधील गूळ रव्यांचा सौदा सुरू असताना अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी सौदे काढण्यास मज्जाव केला.त्यानंतर समितीचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकरी आक्रमक झाले. कर्नाटकी गूळ बंद करा अन्यथा आम्ही समितीत गूळच आणत नाही, असा पवित्रा घेतला. अखेर चर्चेनंतर कर्नाटकातील गुळाची आवक पूर्णपणे थांबवण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शवल्याने कोंडी फुटली.मात्र मंगळवारी सौदे होऊच शकले नाहीत, त्यामुळे बाजार समितीत गुळाचे ९०१८ बॉक्स व २२ हजार गूळ रवे पडून आहेत. आज, बुधवारी अमावस्येमुळे गूळ मार्केट बंद असते, त्यामुळे गुरुवारीच सौदे होणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड