शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

ग्रंथालयांचे धोरण, डिजिटायझेशनचे तोरण; नऊ सदस्यीय धोरण समिताची स्थापना

By समीर देशपांडे | Updated: June 24, 2025 17:12 IST

नव्या ग्रंथालयांना २०१२ पासून मान्यता देणे बंद

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आणि शासकीय ग्रंथालयांचे बळकटीकरण, डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरण करण्याच्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. यासाठीचे धोरण तयार करण्यासाठी डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबईचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन महिन्यांत समितीने अहवाल द्यायचा आहे.राज्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालये व शासकीय ग्रंथालयांची सध्याची स्थिती, ग्रंथालयांचे डिजिटायझेशन, ई लायब्ररी, स्मार्ट ग्रंथालय आणि डिजिटल कनेक्टव्हिटी यासाठी आराखडा तयार करणे, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ई सामग्री व्यवस्थापन, डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी उपाययोजना सुचवणे, ग्रामीण भागातील ग्रंथालयांचे नेटवर्किंग व एकात्मिक व्यवस्थापनाबाबत तसेच ग्रंथखरेदी प्रक्रियेविषयी मार्गदर्शन व शिफारशी, भारत सरकारच्या विविध योजनांमधून निधी मिळवण्यासाठी आधारभूत ठरेल असा प्रकल्प अहवाल तयार करणे, ग्रंथालयांकडून जनतेला लोकाभिमुख सेवा देताना येत असलेल्या अडचणींचा अभ्यास करून राज्यातील ही चळवळ बळकट करण्यासाठी शासनाला ही समिती शिफारस करेल.नव्या ग्रंथालयांचे काय?याबाबतच्या शासन आदेशात नवीन ग्रंथालयांबाबत काहीच उल्लेख झालेला नाही. ‘गाव तेथे ग्रंथालय’ हे शासनाचे जाहीर केलेले धोरण असताना अजूनही निम्म्याहून अधिक गावात ग्रंथालये नाहीत. या समितीने याचा विचार करण्याची गरज आहे. अजूनही ग्रामीण भागात एकत्र येऊन वाचन करण्याची परंपरा आहे याचा विचार होण्याची गरज आहे.

  • राज्यातील एकूण ग्रंथालये ११,१५०
  • नव्या ग्रंथालयांना २०१२ पासून मान्यता देणे बंद