पट्टणकोडोलीत कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:46+5:302021-05-24T04:22:46+5:30

पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर उभे करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. ...

Decision to set up Kovid Center at Pattankodoli | पट्टणकोडोलीत कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय

पट्टणकोडोलीत कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय

पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर उभे करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. पंचायत समिती सदस्य अरुण माळी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत लवकरच देगणीदार व ग्रामस्थांच्या मदतीने आयसोलेशन कोविड सेंटर उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या नियोजित बैठकीस बहुतांशी ग्रामपंचायत सदस्यांनी अनुपस्थिती दाखविली.

कोविड सेंटरच्या उभे करताना श्रेयवादातून बऱ्याच अडचणी येत आहेत. अशातच सदस्यांनी हजेरी न लावल्याने त्यांची कोविड सेंटरप्रती अनास्था दिसून येत आहे.

पट्टणकोडोली गावची लोकसंख्या ३५ हजारांच्या घरात असून सध्या १६० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सातजणांचा मृत्यू झाला आहे. ज्या कोरोनाबाधित व्यक्तींचा उपचार घरीच चालू आहे. अशा व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्य खुलेआम गावातून फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावामध्ये आयसोलेशन कोविड सेंटर उभे करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात पंचायत समिती सदस्य अरुण माळी यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये लवकर आयसोलेशन कोविड सेंटर उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस ग्रामविकास अधिकारी राहुल सिदनाळे, माजी उपसरपंच सुरेश भोजे, अरुण जाधव, मनसे शहराध्यक्ष रवी आडके, इरफान मुजावर, अभिजित भालबर, राकेश आडके, बाळासोा कुशाप्पा व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Decision to set up Kovid Center at Pattankodoli