कोल्हापुरात जबरी दरोड्यात महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 13:57 IST2017-08-14T09:40:31+5:302017-08-14T13:57:07+5:30

कोल्हापुरातील उदगांव -शिरोळ मार्गावर मदरसाजवळ असलेल्या निकम मळ्यात बाबूराव निकम यांच्या घरावर रविवारी मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांच्या मारहाणीत अरुणा बाबूराव निकम (वय 56) यांचा मृ्त्यू झाला आहे.

Death of a woman in Kolhapur in Jabari Daco | कोल्हापुरात जबरी दरोड्यात महिलेचा मृत्यू

कोल्हापुरात जबरी दरोड्यात महिलेचा मृत्यू

उदगांव (कोल्हापूर), दि. 14 - उदगांव -शिरोळ मार्गावर मदरसाजवळ असलेल्या निकम मळ्यात बाबूराव नारायण निकम यांच्या घरावर रविवारी मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांच्या मारहाणीत अरुणा बाबूराव निकम (वय 56) यांचा मृ्त्यू झाला आहे तर बाबूराव नारायण निकम हे गंभीर जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी  24  तोळे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम 50 हजार रुपये असा ऐवज लंपास केला आहे.  दरोडा टाकण्यात आला त्यावेळी घरात दोन मुले सुना व नातवंडासह एकूण 9 जण होते. दरोडेखोरांनी दरोडा घालताना शेजारील घरांना कड्या घातला व  निकम कुटुंबीयांवर हल्ला केला. या घटनेमुळे उदगांव परिसरात दहशत निर्माण झाली आहे.  
 

Web Title: Death of a woman in Kolhapur in Jabari Daco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.