शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

थंडीने कोल्हापूरात दोघा फिरस्त्यांचा मृत्यू, लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 14:51 IST

लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरातील फुटपाथवर झोपलेल्या दोघा फिरस्त्यांचा थंडीने मृत्यू झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. त्यातील एकाची ओळख पटली असून, खंडेराव दिनकरराव कारंडे (वय ६१, रा. नंदवाळ फाटा, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. दुसऱ्याची ओळख पटलेली नाही. गेल्या चार दिवसांत शहरात थंडीचा तिसरा बळी ठरला आहे.

ठळक मुद्देथंडीने कोल्हापूरात दोघा फिरस्त्यांचा मृत्यूलक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरातील घटना

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरातील फुटपाथवर झोपलेल्या दोघा फिरस्त्यांचा थंडीने मृत्यू झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. त्यातील एकाची ओळख पटली असून, खंडेराव दिनकरराव कारंडे (वय ६१, रा. नंदवाळ फाटा, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. दुसऱ्याची ओळख पटलेली नाही. गेल्या चार दिवसांत शहरात थंडीचा तिसरा बळी ठरला आहे.शहरात फिरस्त्यांची संख्या मोठी आहे. रस्त्यावरील, बसस्टॉपवरील पिकअपशेडमध्ये हे फिरस्ते उघडेच झोपत असतात. निवारा नसल्याने थंडीमध्ये काकडत रात्र काढत असतात. रविवारचा लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरात बाजार असतो; त्यामुळे पहाटे सहापासून या ठिकाणी विक्रेत्यांची गर्दी होत होती.

एका दुकानाच्या पायरीवर झोपलेल्या दोघा फिरस्त्यांना विक्रेत्यांनी उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांची हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांना वर्दी देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, ते दोघेही मृतावस्थेत होते. थंडीने गारठून मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यातील एकाच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवरून खंडेराव कारंडे असे मृत फिरस्त्याने नाव समजले. तर दुसऱ्याचा नाव व पत्ता समजू शकला नाही.

पोलीस त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. दोघेही ६० वर्षांच्या पुढचे असल्याने लक्ष्मीपुरी परिसरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दोघेजण शहरात भिक्षा मागून उदरनिर्वाह चालवित असत. 

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूरDeathमृत्यू