Death toll on Gadhinglaj-Mahagaon road-5 deaths on the spot- Death nool village | गडहिंग्लज- महागाव रस्त्यावर भीषण  अपघात-5 जणांचा जागीच मृत्यू -मृत नूल गावचे
गडहिंग्लज- महागाव रस्त्यावर भीषण  अपघात-5 जणांचा जागीच मृत्यू -मृत नूल गावचे

ठळक मुद्दे आई, मुलाचा मृत्यू  अपघातात  वासंती नांदवडेकर आणि मुलगा सोहम नांदवडेकर यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज- महागाव रस्त्यावर भीषण  अपघातामध्ये एकाच गावातील  5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गडहिंग्लज तालुक्याला याच परिसरात सुमो कार आणि बसची धडक बसली आहे. त्यामुळे आज गडहिंग्लजमध्ये घातवार ठरला असं म्हणायला हरकत नाही. चंदगडहून नुलला येताना सुमो कारला अपघात झाला. यामध्ये मृत झालेले पाचही जण कोल्हापूर जिल्ह्यातील नूल गावचे आहेत. अपघाताची माहीती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.  अपघातामुळे बघ्यांची गर्दी झाली आहे. तर घटनेची माहीत मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघाती वाहन बाजूला करण्याचं काम सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून 5 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी  स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 


Web Title: Death toll on Gadhinglaj-Mahagaon road-5 deaths on the spot- Death nool village
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.