निधन वार्ता भाग दोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST2020-12-05T04:58:22+5:302020-12-05T04:58:22+5:30
महत्त्वाची वितरण बातमी : छाया जामदार कोल्हापूर : संध्यामठ गल्ली येथील छाया किरण जामदार (वय ५१) यांचे शुक्रवारी निधन ...

निधन वार्ता भाग दोन
महत्त्वाची वितरण बातमी : छाया जामदार
कोल्हापूर : संध्यामठ गल्ली येथील छाया किरण जामदार (वय ५१) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, आजी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.
फोटो :०४१२२०२० कोल छाया जामदार (निधन)
........................................................
शकुंतला चांदणे
कोल्हापूर : जेऊर (ता. पन्हाळा) येथील शकुंतला बाबूराव चांदणे (वय ८०) यांचे मंगळवारी निधन झाले. माजी सैनिक बाळकृष्ण चांदणे यांच्या त्या मातोश्री होत. शिक्षक बाबूराव चांदणे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, मुलगी असा परिवार आहे.
फोटो : ०४१२२०२० कोल शकुंतला चांदणे (निधन)
इस्माईल लगीवाले
कोल्हापूर : पद्मा कॉलनी येथील इस्माईल रजाक लगीवाले (वय ७६) यांचे निधन झाले. ते निवृत्त नायब तहसीलदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०४१२२०२० कोल इस्माईल लगीवाले (निधन)
तानूबाई दिंडे
कोल्हापूर : टोप (ता. हातकणंगले) येथील तानूबाई दगडू दिंडे (वय ९०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.
फोटो : ०४१२२०२० कोल तानूबाई दिंडे (निधन)
स्वराली कळंबेकर
कोल्हापूर : महालक्ष्मी गल्ली, कळंबा येथील स्वराली सुमंत कळंबेकर (वय ५०) यांचे निधन झाले. तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी सुमंत कळंबेकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, सासू, दीर, पुतणे असा परिवार आहे.
फोटो : ०४१२२०२० कोल स्वराली कळंबेकर (निधन)
........................................
बातमीदार : विनोद