निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST2020-12-25T04:19:37+5:302020-12-25T04:19:37+5:30

कोल्हापूर : सांगरूळ (ता. करवीर) येथील बायक्का महादेव खाडे (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

कोल्हापूर : सांगरूळ (ता. करवीर) येथील बायक्का महादेव खाडे (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीराम हायस्कूलचे शिक्षक नामदेव खाडे व ॲड. कृष्णात खाडे यांच्या त्या आई होत. (फोटो: २४१२२०२०-कोल-बायाक्का खाडे निधन )

दीपक साळोखे

कोल्हापूर : कोंडेकर गल्ली शिवाजी पेठ येथील दीपक गणपतराव साळोखे (वय ६०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. (फोटो: २४१२२०२०-कोल-दीपक साळोखे निधन )

सुमित हात्तीकोटे

कोल्हापूर: शिवगंगा कॉलनी, सानेगुरुजी साळोखेनगर रोड येथील सुमित चंद्रकांत हात्तीकोटे (वय ३०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. माती सावरणे विधी आज, शुक्रवारी आहे. (फोटो: २४१२२०२०-कोल-सुमित हात्तीकोटे निधन )

संदीप स्वामी

कोल्हापूर: रेखा स्काय गार्डन इंगळेनगर येथील संदीप महालिंग स्वामी (वय ४५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, शनिवारी आहे. ते गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करत होते. (फोटो: २४१२२०२०-कोल-संदीप स्वामी निधन )

विजयकुमार भोसले

कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील विजयकुमार दत्ताजीराव भोसले (वय ६४) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: २४१२२०२०-कोल-विजयकुमार भोसले निधन )

Web Title: Death talk