निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:32+5:302020-12-15T04:39:32+5:30
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील शिवराम लक्ष्मण झुरळे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, ...

निधन वार्ता
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील शिवराम लक्ष्मण झुरळे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव झुरळे व प्रा. राजेंद्र झुरळे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे. * शिवराम झुरळे : १४१२२०२०-गड-०१
------------------------
२) रवींद्र नौकुडकर
चंदगड : मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील रवींद्र सखाराम नौकुडकर (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. माजी सरपंच, माजी तंटामुक्त अध्यक्ष व चंदगडचे माजी पं. स. सदस्यपदाचा मान त्यांना मिळाला होता. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे. * रवींद्र नौकुडकर : १४१२०२०-गड-०२
-----------------------
३) राधिका देसाई
चंदगड : किटवडे (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक राधिका अमृत देसाई (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, पुतणे, दीर, जावई, नातवंडे असा परिवार आहे. * राधिका देसाई : १४१२२०२०-गड-०३
-------------------------
४) रुक्मिणी देसाई
चंदगड : हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथील रुक्मिणी पांडुरंग देसाई (वय ८६, सध्या रा. बेळगाव) यांचे
निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. * रुक्मिणी देसाई : १४१२२०२०-गड-०४
-----------------------