गर्भवती महिलेचा रिअॅक्शनमुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:34+5:302021-05-08T04:25:34+5:30
इचलकरंजी : येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेचा इंजेक्शनची रिअॅक्शन आल्यामुळे मृत्यू झाला. पूजा सुहास देसाई ...

गर्भवती महिलेचा रिअॅक्शनमुळे मृत्यू
इचलकरंजी : येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेचा इंजेक्शनची रिअॅक्शन आल्यामुळे मृत्यू झाला. पूजा सुहास देसाई (वय ३२, नरंदे, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे. याबाबतची वर्दी मिलिंद अशोक केटकाळे (४४, रा. कबनूर, ता. हातकणंगले) यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पूजा या गर्भवती महिलेला पोटात दुखू लागल्याने इचलकरंजीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरू असताना इंजेक्शनच्या रिअॅक्शनमुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, मध्यरात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान पूजा यांचा मृत्यू झाला. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतची प्राथमिक नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास हातकणंगले पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.