शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बायकोकडं का बघतोस म्हणत दांडक्याने हाणला, एकाचा मृत्यू; फरारी आरोपी तरूण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 11:27 IST

पोलिसांना ‘टीप’ दिल्याच्या रागातून कृत्य?

गडहिंग्लज : माझ्या बायकोकडं सारखं का बघतोस ? तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केल्यामुळे एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्यानंतर फरार झालेल्या तरूणाला तब्बल १३ दिवसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

उत्तम भरमू नाईक (वय ५०) असे मृताचे नाव तर सचिन भिमराव नाईक (वय ३६) असे आरोपीचे नाव असून दोघेही बिद्रेवाडी, ता. गडहिंग्लज येथील रहिवाशी आहेत. या प्रकारामुळे नेसरीसह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.पोलिसातून मिळालेली माहिती अशी, बिद्रेवाडी, ता. गडहिंग्लज येथील उत्तम नाईक व सचिन नाईक हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. रविवारी (७) उत्तम हे जेवणानंतर आपल्या घराच्या कट्यावर बसले होते.दरम्यान, सचिन याने उत्तमच्या जवळ जावून ‘तू माझ्या बायकोकडे सारखे का बघतोस असे म्हणत वाद घातला, आज तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने उत्तम यांना उपचारासाठी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी (१४) उत्तम यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सचिनविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.तथापि, या घटनेनंतर सचिन हा घरातून फरार झाला होता. त्यामुळे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना शोधपथके तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी ३ पथकाद्वारे सचिनच्या शोधासाठी सापळा लावला होता.पोलिस निरीक्षक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे, अमोल कोळेकर, महेश गवळी, अमित सर्जे, समीर कांबळे, नवनाथ कदम, शिवानंद मठपती, तुकाराम राजगिरे, सुशिल पाटील, यशवंत कुंभार, राजेंद्र वरंडेकर, अजय गोडबोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

उत्तम बेशुद्ध,सचिन पसार!लाकडी दांडक्याचा प्रहार वर्मी लागल्यामुळे उत्तम जागेवरच बेशुद्ध पडला होता.नेसरी ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर त्याला गडहिंग्लज येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.दरम्यान,त्याचा भाऊ लक्ष्मण यांच्या फिर्यादीवरून नेसरी पोलीस ठाण्यात सचिनविरूद्ध गुन्हा दाखल झाला.म्हणूनच, तो गावातून पसार झाला होता.

'लिंगनूर'मध्ये अटक, गुन्ह्याची कबुलीपोलिस अंमलदार अमोल कोळेकर यांना खबºयांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन हा निपाणीहून लिंगनूर कापशीकडे जाणार असल्याची माहिती. त्यानुसार लिंगनूर पोलिस चौकीजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांना ‘टीप’ दिल्याच्या रागातून कृत्य?या घटनेमागे बेकायदा दारू विक्रीचे कारण असून त्याची टीप पोलिसांना दिल्याच्या रागातूनच सचिन याने उत्तम याला मारहाण केल्याची चर्चा नेसरी परिसरात आहे.   सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संदीप कांबळे यांनीही त्याला दुजोरा दिला असून त्यादृष्टीने तपास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस