शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कसबा बावड्यात डेंग्यूमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू, महापालिका आरोग्य प्रशासन सतर्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 12:38 IST

विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर पथकाची भेट

कोल्हापूर : कसबा बावड्यातील बिरंजे पाणंद येथील ज्योतिरादित्य जयसिंह नाईक (वय १८) या विद्यार्थ्याचा गुरुवारी डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर महापालिका आरोग्य प्रशासन सतर्क झाले. पहिल्या टप्प्यात कसबा बावड्यातील एक हजार कुटुंबांचे डेंग्यूचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.शुक्रवारी आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, साथरोग नियंत्रण अधिकारी निखिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नाईक यांच्या घरी भेट दिली. भेटीत नातेवाइकांकडून नाईक यांच्या उपचाराची माहिती घेतली. त्यामध्ये ज्योतिरादित्य याला ताप आल्यानंतर २५ रोजी खासगी दवाखान्यात तपासणी करून घेतली. औषधानंतर ताप कमी झाला. पुन्हा ताप आल्यानंतर डेंग्यूच्या चाचण्या करून घेण्यात आल्या. प्लेटलेटची तपासणी केल्यानंतर ते १ लाख ५९ हजार असल्याचे समोर आले. यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. उपचारावेळी त्याच्या मेंदूतही रक्तस्राव झाल्याचे समोर आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती महापालिका आरोग्य पथकास दिल्याची माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दरम्यान, आरोग्य पथकाने तातडीने बिरंजे पाणंद परिसराची पाहणी केली. या परिसरातील १५९ कुटुंबांतील ५३ जणांची तपासणी करण्यात आली. डास प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जात आहेत. परिसराची स्वच्छता करण्यात आली. डेंग्यूचा डास स्वच्छ साठवलेल्या पाण्यात तयार होतो. खबरदारीचा उपाय म्हणून घरामध्ये वापरासाठी भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर व भांडी आठवड्यातून एकवेळा कोरडी करून घासून पुसून स्वच्छ करून ठेवावीत. एक दिवस कोरडा दिवस पाळावा. नारळाच्या करवंट्या, न वापरातील डबे, टायरची वेळीच विल्हेवाट लावावी. झाडांच्या कुंडया, फ्रीजच्या मागील ट्रेमध्ये पाणी साचू देऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले.डेथ ऑडिट होणारज्योतिरादित्य नाईक या विद्यार्थ्याचा मृत्यू डेंग्यूनेच झाला आहे. त्याने उपचारादरम्यान केलेल्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. तरीही त्याच्या मृत्यूचे सविस्तर डेथ ऑडिट होणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या जिल्हास्तरीय पथकाकडून ऑडिट होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdengueडेंग्यूHealthआरोग्य