निधन वार्ता फाईल ०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:18 IST2021-06-26T04:18:19+5:302021-06-26T04:18:19+5:30

कोल्हापूर : मरगाई गल्ली शिवाजी पेठ येथील मालूताई रंगराव पाटील (वय ८१) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, ...

Death News File 02 | निधन वार्ता फाईल ०२

निधन वार्ता फाईल ०२

कोल्हापूर : मरगाई गल्ली शिवाजी पेठ येथील मालूताई रंगराव पाटील (वय ८१) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, तीन मुले, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. बिनखांबी मंदिर येथील आर.के.टेलर्सचे नंदकुमार पाटील, व्यंकटेश नागरी पतसंस्थेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या त्या आइं होत. रक्षाविसर्जन आज शनिवारी आहे. (फोटो: २५०६२०२१-कोल-मालुताई पाटील निधन)

कल्लाप्पा सपाटे

कागल : कसबा सांगाव येथील कल्लाप्पा भाऊ सपाटे (वय ८६) यांचे मोहोळ जि. सोलापूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. (फोटो: २५०६२०२१-कोल-कल्लाप्पा सपाटे निधन)

सुखदेव पाटील

कोल्हापूर : सानेगुरुजी येथील सुखदेव शंकर पाटील (वय ६९) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, जावई असा परिवार आहे. (फोटो: २५०६२०२१-कोल-सुखदेव पाटील निधन)

कृष्णात पाटील

कोल्हापूर: वरणगे पाडळी येथील कृष्णात दादू पाटील (वय ८८) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: २५०६२०२१-कोल-कृष्णात पाटील निधन)

Web Title: Death News File 02