हल्ल्यातील जखमी गुरसाळेचा मृत्यू

By Admin | Updated: March 22, 2015 01:12 IST2015-03-22T01:09:47+5:302015-03-22T01:12:19+5:30

इचलकरंजीचे गँगवॉर : खुनाचा गुन्हा दाखल करणार

The death of the injured muck in the attack | हल्ल्यातील जखमी गुरसाळेचा मृत्यू

हल्ल्यातील जखमी गुरसाळेचा मृत्यू

इचलकरंजी : पूर्ववैमनस्यातून खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजू ऊर्फ राजशील सत्यवान गुरसाळे (वय ३५, रा. शाहूनगर, चंदूर) याचा कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी मृत्यू झाला. या हल्ल्याप्रकरणी अटक केलेले महेश भाकरे, राहुल उबाळे, नितीन बुरांडे व रियाज शेख हे चौघेजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या चौघांवर शिवाजीनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करणार आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी, शाहूनगर गल्ली नं. १२ येथील सराईत गुन्हेगार राजशील गुरसाळे हा हॉटेल बंद करून घरासमोर थांबला असताना शुक्रवारी (दि. १३) त्याच्यावर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महेश भाकरे, राहुल उबाळे, नितीन बुरांडे व रियाज शेख यांनी राजशील याच्यावर सशस्त्र हल्ला चढविला. या चौघांनी लाठ्या, काठ्या, लोखंडी सळ्या, मागाचे मार व दगड, आदींचा वापर करत गुरसाळे याला गंभीर जखमी केले होते. यावेळी राजशील याची पत्नी राजलक्ष्मी ही घराबाहेर आली. हल्लेखोरांनी तिच्यावरही हल्ला केला होता. राजशील गंभीर जखमी झाल्याने व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. गत नऊ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी गुरसाळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या हल्ल्याप्रकरणी उबाळे, बुरांडे, भाकरे व शेख या चौघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the injured muck in the attack