शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताने गोळी उडून कोल्हापूरच्या कर्नलचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 16:05 IST

काश्मिरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात अपघाताने डोक्यात गोळी घुसून लष्करातील कर्नलपदावरील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. कर्नल जयवंत व्ही. महाडिक असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळचे कोल्हापूरचे आहेत.

ठळक मुद्देअपघाताने गोळी उडून कोल्हापूरच्या कर्नलचा मृत्यूजम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील खुंडरु येथील दुर्घटना

श्रीनगर/कोल्हापूर : काश्मिरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात अपघाताने डोक्यात गोळी घुसून लष्करातील कर्नलपदावरील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. कर्नल जयवंत व्ही. महाडिक असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळचे कोल्हापूरचे आहेत.संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नल जे. व्ही. महाडिक (कॉर्प्स आॅफ आर्टिलरी) हे जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील खुंडरु येथील स्टेशन मुख्यालयात अ‍ॅडम कमांडट म्हणून सेवेत होते. सोमवारी दुपारी ४ वाजून २0 मिनिटांनी हा अपघात झाला. ते सेवेच्या ठिकाणाहून निवासस्थानाकडे जिप्सी वाहनातून जात होते. चालकाशेजारीच ते बसले होते.प्रवासादरम्यान त्यांच्याजवळील व्यक्तिगत कार्बाईनमधून ही गोळी सुटली. ही बंदूक त्यांनी आपल्या मांडीवर ठेवली होती. त्यातून अचानक गोळी सुटून ती कर्नल महाडिक यांच्या डोक्यातून मानेत घुसली. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले, परंतु त्यांचा मृत्यू झाला.महाडिक हे नुकतेच अभ्यास रजेवरुन सेवेच्या ठिकाणी रुजू झाले होते. डिसेंबर १९८९ मध्ये ते कॉर्प्स आॅफ आर्टिलरी म्हणून सेवेत दाखल झाले होते. सेट झेवियर स्कूलच्या १९८३ च्या तुकडीचे ते विद्यार्थी होत. त्यांची काश्मिरमध्ये अलिकडेच नेमणुक झाली होती. कोल्हापूरातील राजारामपुरी आणि महालक्ष्मीनगर परिसरात त्यांचे वास्तव्य होते. त्यानंतर त्यांचा दिल्लीत मुक्काम होता.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAccidentअपघातkolhapurकोल्हापूर