शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

धोकादायक वळण ! हितगुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:16 AM

ही समस्या कशामुळे आहे हे समजल्यास त्यावर उपाय करता येतो. जर एखाद्या मेंदूतील ट्युमरमुळे असेल तर त्याच्यावरील उपचार होऊ शकतो. अतिताण, चुकीचा आहार ही कारणे पण बरी होऊ शकतात. गुणसूत्रांमधील

डॉ. भारती अभ्यंकरही समस्या कशामुळे आहे हे समजल्यास त्यावर उपाय करता येतो. जर एखाद्या मेंदूतील ट्युमरमुळे असेल तर त्याच्यावरील उपचार होऊ शकतो. अतिताण, चुकीचा आहार ही कारणे पण बरी होऊ शकतात. गुणसूत्रांमधील दोष असल्यास किंवा अवयव तयारच झालेले नसतील तर मात्र यावरील उपाय खूप वेगळे असतात. यामध्ये समुपदेशनाची खूपच गरज असते. संपूर्ण कुटुंबाचे समुपदेशन करणे योग्य ठरते.

मीरा एक लाजरी-बुजरी सतरा वर्षांची गोड मुलगी, आपल्या आईबरोबर माझ्याकडे आली. बराच वेळ झाला तरी नक्की काय बोलायचंय याचा अंदाज येत नव्हता. शेवटी तिच्या आईने सांगितले, मॅडम, आता पुढच्या महिन्यात मीरा अठरा वर्षांची होईल; परंतु अद्याप तिची मासिक पाळी सुरू झालेली नाही. बरोबरच्या सगळ्या मैत्रिणी याबद्दल बोलत असतात, परंतु हिच्याबाबत तसं काहीच होत नसल्याने

आम्ही काळजीत पडलोय. मॅडम, काय समस्या असू शकेल हो? मीराची व तिच्या आईची अवस्थामला जाणवत होती. त्यांना म्हटले, आपण व्यवस्थित तपासू व नक्की अडचण कुठे आहे हे जाणण्याचा प्रयत्न करू.वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत मासिक पाळी सुरू न झाल्यास त्याला ढ१्रें१८ अ‍ेील्लङ्म११ँङ्मीं असे म्हणतात. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत जर दुय्यम लैंगिक बदल जसे की स्तनांची वाढ, काखेत केसांची वाढ वगैरे न झाल्यास त्या मुलीची तपासणी करणे गरजेचे असते.

आता याची कारणे काय असू शकतात ते पाहूया : १) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलगी गरोदर तर नाही ना हे पाहिले पाहिजे. आजकालच्या मुक्त जीवनशैलीमुळे, मुला-मुलींना दिल्या जाणाऱ्या अमर्याद स्वातंत्र्यामुळे हातात असणाºया मोबाईल, इंटरनेटद्वारे लहान वयातच लैंगिकतेबद्दल आकर्षण वाटू शकते. प्रचंड दबावालासुद्धा ती बळी पडू शकते. त्याचा परिणाम म्हणजे गरोदरपणा! तर सगळ्यात पहिली शंका ही गरोदरपणाची येते. २) गुणसूत्रांमधील दोष हे मुख्य कारण असते. साधारणपणे स्त्रियांमध्ये गुणसूत्रांची रचना 46 अशी असते (पुरुषांमध्ये ती 46 अशी असते.) यामध्ये Tueners Syndrome चा समावेश होतो. ज्यामध्ये गुणसूत्रांची रचना 46 0 अशी असते. बºयाच वेळा जन्मजात असणारे दोष ज्यामध्ये संप्रेरकांचा अभाव असतो. पीयुषिका ग्रंथीचे दोष असतात, ज्यामुळे संप्रेरके तयार होत नाहीत व अवयवांची वाढ खुंटते. २) ‘टर्नर’मध्ये एका गुणसूत्राचा अभाव होतो व त्यामुळे तिची रचना 45 0 अशी असते. ही व्याधी असणाºया मुली एका विशिष्ट प्रकारच्या शारीरिक ठेवणीवरून लक्षात येतात. या मुलींची मान खूप लहान असते. उंची किंवा चण छोटी असते. हात-पाय थोडे सुुजलेले असतात. कान थोडे खालच्या बाजूला असतात. याबरोबरच त्यांच्यामध्ये हृदयाचे आजारही असू शकतात. मधुमेह, थायरॉईड हे आजारसुद्धा या मुलींमध्ये असू शकतात. ३) काहीवेळा अ१िील्लं’ ग्रंथींची अतिरिक्त वाढ (Congenital Adrenal Hyperplasia)ÀfbðXf Primary Amenorrhoea चे कारण असू शकते. ४) पॅराथायरॉईडचे आजार, पीयूषिका ग्रंथीचे ट्युमर, मेंदूतील गाठी, यासुद्धा पाळी न येण्यास कारणीभूत ठरतात. ५) खूपवेळेला मेंदूपासून होणारे सर्व नियमन, संप्रेरके योग्य प्रमाणात असतात परंतु गर्भाशयच तयार झालेला नसतो किंवा योनीमार्ग तयार नसतो. बºयाच वेळेला बीजकोष दोषी असू शकतात. ६) काही मुलींच्यामध्ये मेंदूकडून होणारे नियमन व्यवस्थित असते, गर्भाशय, बीजकोष व्यवस्थित असतात. मासिक पाळी होत असते, परंतु ती बाहेर पडण्याच्या मार्गात दोष असतो. योनीमार्गावरील पडद्याला असणारे छिद्र या मुलींमध्ये नसते. त्याला Impertorate Stymen म्हणतात. दर महिन्याला मासिक पाळीच्यावेळी मुलीच्या पोटात खूप दुखते, असह्य वेदना होतात. त्यावेळी योग्य तपासणींद्वारा याचे निदान होते. छोट्याशा आॅपरेशनद्वारा यातून पूर्णपणे बरे होता येते.  Primary Amenorrhoea  निदान. १) या सर्व गोष्टींमध्ये त्या मुलीची माहिती, तिच्या सर्व सिस्टीमचा अभ्यास करणे खूप गरजेचे असते. २) याशिवाय संप्रेरकांची तपासणी  (FSH, LH, TSIT, Prolactin) वगैरे करणे गरजेचे असते. ३) ‘टर्नर’सारख्या व्याधींमध्ये गुणसुत्रांची तपासणी करणे गरजेचे असते. ४) सोनोग्राफीद्वारे गर्भाशय, बीजकोष व्यवस्थित आहेत का हे तपासले जाते.५) बºयाच केसेसमध्ये पीयुषिका ग्रंथीसाठी टफक सारख्या तपासण्या कराव्या लागतात. ६) याशिवाय अतिताण, चुकीच्या आहार पद्धती, Dieting fads  यामुळे संप्रेरकांचे प्रमाण असंतुलित होते व पाळी येणे थांबू शकते. ७) काहीवेळा काही मुलींमध्ये पाळी सुरू होण्याचे वय जास्त असते Delayed Puberlyअसू शकते.(लेखिका कोल्हापुरातील स्त्री रोग वप्रसूतिशास्त्रतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर