शिरोली दुमाला येथे धोकादायक विद्युत डीपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:50 IST2021-09-02T04:50:41+5:302021-09-02T04:50:41+5:30
सावरवाडी : शिरोली दुमाला (ता. करवीर) गावांच्या मुख्य रस्त्यानजीक असलेल्या विद्युत वाहिनीच्या डीपीची दुरवस्था ...

शिरोली दुमाला येथे धोकादायक विद्युत डीपी
सावरवाडी : शिरोली दुमाला (ता. करवीर) गावांच्या मुख्य रस्त्यानजीक असलेल्या विद्युत वाहिनीच्या डीपीची दुरवस्था झाली आहे. या धोकादायक डीपीचे बांधकाम महिनाभर रखडलेल्या अवस्थेत असल्यामुळे रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
जुलै महिन्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शिरोली दुमाला येथील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर प्रचंड स्वरूपाचे पाणी आले होते. या विद्युत डीपीचा पृष्ठभाग पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे ही विद्युत डीपी धोकादायक बनल्याने कधी रस्त्यावर कोसळेल याचा नेम नाही. शिवाय डीपी नजीक पेट्रोल पंपही आहे. डीपीच्या पृष्ठभागाची ओढ्याच्या पुराच्या पाण्यामुळे पडझड झाली. वीज वितरण कंपनीने वेळीच लक्ष घालून या डीपीच्या दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी मागणी होत आहे.
३१ शिरोली दुमाला डीपी