Damascus awards announced, 17 books honored | दमसाचे पुरस्कार जाहीर, १७ पुस्तकांचा सन्मा8न

दमसाचे पुरस्कार जाहीर, १७ पुस्तकांचा सन्मा8न

ठळक मुद्देदमसाचे पुरस्कार जाहीर, १७ पुस्तकांचा सन्मा8नवासंती मेरु, अरुण शिंदे, सुप्रिया आवारे, चंद्रशेखर कांबळे यांना पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे दिल्या जाणाऱ्या २०१९ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी वासंती मेरु, डॉ. अरुण शिंदे, डॉ. सुप्रिया आवारे, चंद्रशेखर कांबळे आदींसह १७ पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. कोविड परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखक -. देवदत्त पाटील पुरस्कार-मृत्यूस्पर्श-डॉ. सतीश कुमार पाटील, (कादंबरी ), शंकर खंडू पाटील पुरस्कार-सत्यवादी-बजरंग दत्तू (कथासंग्रह), अण्णा भाऊ साठे पुरस्कार-उद्ध्वस्त मनाचा गाभारा- वासंती मेरु (सामाजिक), कृ. गो.सूर्यवंशी पुरस्कार-सत्यशोधकीय नियतकालिके-डॉ.अरुण शिंदे (संकीर्ण), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन)- न बांधल्या जाणाऱ्या घरात -डॉ. सुप्रिया आवारे (कवितासंग्रह), शैला सायनाकर पुरस्कार - शेणाला गेलेल्या पोरी -चंद्रशेखर कांबळे (कवितासंग्रह) आणि बालवाड्मय पुरस्कार- बार्बी डॉल-वर्षा चौगुले.

विशेष पुरस्कार ‌: सखा कलाल पुरस्कारः फास-बाळासाहेब पाटील, अनुराधा गुरव पुरस्कारः अरुणोदय-स्वाती शिंदे पवार, इतरः सूर्य गोंदला भाळी-जगजित महावंश, त्यांचे जिणे-मंगेश मंत्री, कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे-लवकुमार मुळे, वारणेची लेकरं-विठ्ठल सदामते, सावज-सुनील देसाई, गंध सोनचाफी-गौतम कांबळे, निर्भय-उमेश सूर्यवंशी.भारतीय संविधान आणि लोक-विश्वास सुतार.

परिक्षक म्हणून नामदेव माळी, डॉ. जी. पी. माळी, गोविंद पाटील, दयासागर बन्ने यांनी काम पाहिले, अशी माहिती दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम आणि सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली.

 

Web Title: Damascus awards announced, 17 books honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.