कोल्हापूर : शहरातील बाबूजमाल रोडवरील एका जुन्या इमारतीची एका बाजूची भिंत कोसळल्याची घटना घडली. यात एका कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जुन्या इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.केदार मोहिते आणि कुटुंबियांच्या मालकीच्या घराची भिंत संजय गवळी यांच्या घराच्या पार्किंग मध्ये कोसळली. यामुळे कारचे मोठं नुकसान झाले आहे. ही भिंत धोकादायक स्थितीत होती आणि ती पाडण्यासाठी संबंधित मालकांनी महापालिकेकडे जानेवारी महिन्यापासून पाठपुरावा केला होता.या घटनेत एका सलून शेजारील गवळी कुटुंबियांच्या कारचे नुकसान झाले आहे. दोन दिवसापासून त्याच्या घरात मंगल कार्य सुरु होते. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.
कोल्हापूर : बाबूजमाल परिसरात भिंत कोसळून कारचे नुकसान, जुन्या इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 18:37 IST