पाणी पातळीत घट, नृसिंहवाडीत पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 06:22 PM2020-08-13T18:22:13+5:302020-08-13T18:24:42+5:30

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने येथील दत्त मंदिरात आज सकाळी चालू सालातील पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. लॉकडाउनमूळे मंदिर दर्शनासाठी बंद असलेने श्रावण गुरुवार व दक्षिणद्वार सोहळा या योगाचा लाभ घेऊन भाविकांना स्नान करता आले नाही.

Dakshinadwar ceremony at Nrusinhwadi descent | पाणी पातळीत घट, नृसिंहवाडीत पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा संपन्न

 कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झालेने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. (छाया- प्रशांत कोडणीकर)

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी पातळीत घट नृसिंहवाडीत पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा संपन्न

नृसिंहवाडी- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने येथील दत्त मंदिरात आज सकाळी चालू सालातील पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. लॉकडाउनमूळे मंदिर दर्शनासाठी बंद असलेने श्रावण गुरुवार व दक्षिणद्वार सोहळा या योगाचा लाभ घेऊन भाविकांना स्नान करता आले नाही.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने येथील नदीच्या पाणी पातळीत संथपणे घट होत होती. पाच ऑगस्ट रोजी पाणी पातळीत वाढ झाल्याने चालू सालातील पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर पाण्याच्या पातळीत बारा फुटाने वाढ होऊन पाणी स्थिर झाले होते.

आज सायंकाळी सहा वाजता मुख्य मंदिरातील पाणी कमी झालेने श्रींचे चरणकमलावर महापूजा करण्यात आली. त्यानंतर धूप दीप आरती होऊन धावे व करुणात्रिपदी म्हणण्यात आली व त्यानंतर मंदिरातशेजारती झाली.

 

Web Title: Dakshinadwar ceremony at Nrusinhwadi descent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.