दाजिबा देसाई व्याख्यानमाला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:25 IST2021-03-17T04:25:03+5:302021-03-17T04:25:03+5:30

तारदाळचे शिरकाईदेवी मंदिर बंद कोल्हापूर : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील शिरकाई देवीची तीन दिवसांची यात्रा कोरोनामुळे रद्द झाली. ...

Dajiba Desai lecture series canceled | दाजिबा देसाई व्याख्यानमाला रद्द

दाजिबा देसाई व्याख्यानमाला रद्द

तारदाळचे शिरकाईदेवी मंदिर बंद

कोल्हापूर : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील शिरकाई देवीची तीन दिवसांची यात्रा कोरोनामुळे रद्द झाली. शासकीय आदेशानुसार मंदिरात कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही. स्थानिक गुरव बंधूंनी देवीची पूजाअर्चा पहाटेच केली. गणपतीची आरती मोजक्या ग्रामस्थांच्या व भक्तांच्या उपस्थितीत झाली. कोल्हापुरातील शनिवार पेठेतील भक्तांनी पाच फूट उंचीची व दहा तास चालणारी अगरबत्ती तिथे लावण्यात आली. सर्वांनी मंदिराच्या बाहेरूनच मुखदर्शन घेतले. देवीची ओटी भरून नैवेद्य दाखवला व शुभाशीर्वाद घेतले.

राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी राजेंद्र बनसोडे यांची निवड

कोल्हापूर : येथील शा. कृ.पंत वालावलकर हायस्कूलचे क्रीडाशिक्षक राजेंद्र बनसोडे यांची चौतीसाव्या वरिष्ठ राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून निवड झाली. ही स्पर्धा आंध्रप्रदेशात २९ मार्चपासून होणार आहे.

पुरुष-महिला संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर दहिवडी (जि.सातारा) येथे २५ मार्चपर्यंत होणार आहे. महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे सचिव राजेंद्र इखनकर यांनी निवडीचे पत्र दिले. आंतरभारतीचे सचिव एम.एस.पाटोळे, पल्लवी कोरगांवकर, महावीर मुडबिद्रीकर यांचे त्यांना प्राेत्साहन लाभले.

फोटो : १६०३२०२१-कोल-राजेंद्र बनसोडे-निवड

Web Title: Dajiba Desai lecture series canceled