शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

दादा.. भ्रष्टाचारी ‘सायटर’ना दूर ठेवा!

By admin | Updated: September 5, 2015 00:08 IST

‘चाय पे चर्चा’मध्ये वकिलाचा डोस : महावीर गार्डनमध्ये नागरिकांनी मांडली विविध प्रश्नांची जंत्री

कोल्हापूर : दादा, तुम्ही सरकारमध्ये प्रतिमुख्यमंत्री आहात. तुमच्यामार्फत कोणतेही काम शासनदरबारी गेले तर ते होणारच. मात्र, तुमच्या आसपास असणाऱ्या बगलबच्च्यांच्या (सायटर) भ्रष्टाचारामुळे खुद्द तुमचीही प्रतिमा खराब होत आहे. तुम्ही चारित्र्यवान आहात. त्यामुळे नजीकच्या काळात तुम्ही अशा लोकांना दूर करा, असा सल्ला शुक्रवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना खुद्द एका वकिलांनीच दिला. माईकवरून केलेल्या या सूचनेवरून कार्यक्रमात चांगलीच पंचायत झाली. दादांनाही त्याचे उत्तर देणे अवघड बनले. त्यामुळे या प्रश्नास त्यांनी बगल दिली.महापालिका निवडणुकीतील ताराराणी आघाडी-भाजप, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावतीने महावीर गार्डनमध्ये सकाळी सात वाजता ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष महेश जाधव, सुहास लटोरे, सुनील कदम, सुनील मोदी, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास सकाळी फिरायला आलेल्या मान्यवरांची गर्दी होती. लोक स्वत:हून माईकवर पालकमंत्र्यांना प्रश्न विचारत होते. दोन प्रश्न झाल्यानंतर बी. एस. पाटील म्हणाले, ‘आम्ही सर्किट बेंचच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, दादांच्याकडूनच तुम्ही या. आमच्या सरकारमधील ते प्रतिमुख्यमंत्री आहेत. एवढा मानसन्मान तुम्हाला पक्षात व सरकारमध्ये असताना तुमची प्रतिमा मलिन होऊ नये याची दक्षता घ्या.’ पाटील यांनी नागरी प्रश्न मांडण्याऐवजी थेट बगलबच्च्यांच्या भ्रष्टाचाराबद्दलच आरोप केल्याने खळबळ उडाली. श्रोत्यांत चुळबुळ झाली, परंतु हा विषय त्या सूचनेवरच संपला. पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे स्थापन केली जातील. डिसेंबर २०१५ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन दिवसांचा महोत्सवही घेतला जाईल. महिलांसाठी शहरात १०० योग केंद्रे, ५३ लहान मुलांची ‘खेळघरे’ स्थापन केली जातील. यामध्ये ४५ मिनिटे खेळ आणि ४५ मिनिटे अभ्यास घेतला जाणार आहे. अशा प्रकारचे केंद्र सध्या जागृतीनगर येथे सुरू आहे. तसेच बेरोजगारांना तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील रेमंड, किर्लोस्कर, आदी कंपन्यांत नोकरीची संधी देऊ. चर्चेत माजी उपमहापौर उदय पोवार, राजेंद्र कडूदेशमुख, अनिल शिंदे, नारायण कांझर, आदींनी सहभाग घेतला. महावीर गार्डन हास्य क्लब, रिंग क्लब यांच्यासह मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही या चर्चेत सहभाग घेतला.भ्रष्टाचाऱ्यांची गय नाहीराज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात आतापर्यंत २०० भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी घालविले; तर अनेक वर्षे बढती नसलेल्या ७०० जणांना एकाच वेळी बढती दिली. एक हजार जणांच्या बदल्या केल्या. या बदल्यांबद्दल एकाने मला ‘भुजबळांसारखे तुम्ही मिळवले असते, तर तुमच्या महापालिकेचा अर्थसंकल्प झाला असता,’ असे हिशेब करून सांगितले. महापालिकेत निवडून देणाऱ्या नगरसेवकाने भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले तर त्याला तत्काळ राजीनामा द्यायला लावू, अशी ग्वाहीही पालकमंत्री पाटील यांनी दिली....तर मालक मरून जाईल!महापालिकेचा विकास आराखडा मंजूर करताना नागरिकांसमोर ठेवावा. कारण ‘आयआरबी’सारखे प्रकल्प आपल्या डोक्यावर बसले आहेत. याशिवाय महापालिकेने जुन्या घरांना घरफाळा नव्या रेडीरेकनरप्रमाणे लावला आहे. यामध्ये जुन्या घरांचा घसारा धरलेला नाही. त्यामुळे अशी घरफाळा वसुली केली तर मालक मरून जाईल, अशी कैफियत सुनील डुणुंग यांनी मांडली.