कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे मंगळवारी उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्रत्येक शाखेत प्रथम प्रवेश घेणारे विद्यार्थी व प्रत्येक शाखेतील टॉपर्स अशा एकूण १६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून संपूर्ण ४ वर्षांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी केली.
१९८३ पासून अभियांत्रिकी शाखांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे. स्वायत्त महाविद्यालयातील पहिल्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष बुधवारपासून सुरू होत आहे. यानिमित्त 'वेलकम अँड ओरिएन्टेशन' समारंभ मंगळवारी सेमिनार हॉल येथे झाला. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही मालदे, आर्किटेक्चर विभागाचे डीन आर. जी सावंत, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. के. पी. चोपडे, सीएचआरओ श्रीलेखा साटम, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, पॉलिटेक्निक महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. महादेव नरके उपस्थित होते.
यावेळी डॉ. संजय पाटील यांनी, डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व शाखांमध्ये १०० टक्के प्रवेश झाले असून अजूनही कित्येक प्रवेश वेटिंगवर आहेत, हीच महविद्यालयाच्या यश व विश्वासाची पावती असल्याचे सांगितले. स्वायत्त महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू होताच पहिल्याच दिवशी व प्रत्येक शाखेत सर्वप्रथम प्रवेश घेणारे ८ विद्यार्थी व प्रत्येक शाखेत सर्वोच्च गुण मिळवून प्रवेश घेतलेल्या ८ विद्यार्थी अशा १६ विद्यार्थ्यांना संपूर्ण शिष्यवृत्ती देण्याची घोषणा डॉ. पाटील यांनी यावेळी केली.
चौकट : यांना मिळाला शिष्यवृत्तीचा लाभ....
अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी जाहीर केलेल्या या शिष्यवृत्तीचा लाभ शाखानिहाय प्रथम प्रवेश घेणाऱ्या जान्हवी पाटील, अविष्कार कदम, स्मिता यादव, सीमाक कापडे, अथर्व पार्ले, पूजा जुगळे, शेजल सुतार, आर्या कुलकर्णी व सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या अर्बाज बागवान, सुशांत शेळके, प्रथमेश ढवळे, स्वप्निल शिंदे, आकाश मंडलिक, मिथाली पाटील, रेश्मा भाईगडे, तुषार कोष्टी, आदी विद्यार्थ्यांना मिळाला आहे.
फोटो : ०२ डीवाय पाटील
१
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित 'वेलकम अँड ओरिएन्टेशन' प्रोग्राम’मध्ये मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील. यावेळी डॉ. मालदे, डॉ. संतोष चेडे, डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्रा. चोपडे, प्रा. सावंत, आदी.