कोल्हापूरातून किसन काटकर : इचलकरंजीतून बी. जी. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:12 IST2019-03-18T16:11:10+5:302019-03-18T16:12:03+5:30
बळीराज पार्टी व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी १६ उमेदवारांची घोषणा सोमवारी पक्षाचे महासचिव दिंगबर लोहार यांनी केली. कोल्हापूरमधून किसन काटकर तर इचलकरंजीतून बी. जी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूरातून किसन काटकर : इचलकरंजीतून बी. जी. पाटील
कोल्हापूर : बळीराज पार्टी व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी १६ उमेदवारांची घोषणा सोमवारी पक्षाचे महासचिव दिंगबर लोहार यांनी केली. कोल्हापूरमधून किसन काटकर तर इचलकरंजीतून बी. जी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोहार म्हणाले, केंद्रातील सरकारच्या कारभाराने सामान्य जनता त्रस्त असून त्यांना आधार देणारे उमेदवार व पक्षांची गरज आहे. बळीराजा पार्टीची संकल्पनाच कष्टकरी जनतेला बळ देण्याची असून त्यातूनच लोकसभा निवडणूकीला सामोरे जात आहे. बळीराजा शेतकरी संघटनेसह इतर छोटे छोटे पक्षांना सोबत घेण्याचा निर्णण रविवारी रात्री पुण्यातील बैठकीत झाला. त्यातूनच सोळा उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.
‘बळीराजा’ पार्टीचे उमेदवार असे, कंसात मतदारसंघ, किसन काटकर (कोल्हापूर), बी. जी. काका पाटील (हातकणंगले), पंजाबराव पाटील (सातारा), संजय पाटील (माढा), गणेश काका जगताप (बारामती), मोहन घारे (शिरूर), संभाजी गुणहाट (मावळ), पवन हिरे (शिर्डी), संजय पाशीलकर (रायगड), अरूण कनोरे (मुंबई उत्तर पुर्व), खुशबू बेलेकर (नागपूर), अॅड. शिला ढगे (वर्धा), नंद नरोटे (गडचिरोली), डॉ. धनंजय नालट (अकोला), संजय देशमुख (बुलढाणा), संजय टेंबरे (भंडारा-गोंदिया). याशिवाय बिहार, झारखंड, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यात पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे लोहार यांनी सांगितले. यावेळी यशवंत महाडिक, शिवाजीराव माळकर, एकनाथ रसाळ, दत्तात्रय सुतार, रणजीत गुरव, भैय्या वाघमारे आदी उपस्थित होते.