शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

लाकडापेक्षा तोडणीचा दर भरमसाट

By admin | Updated: September 4, 2016 00:49 IST

थेट लाईन प्रश्न : महापालिकेचा आंधळा कारभार; प्रकार उघडकीस आल्यानंतर आयुक्तांनी ठेकेदाराचे बिल रोखले

कोल्हापूर : स्मशानभूमीकरिता लागणारी लाकडे प्रतिटन चार हजार रुपये दराने खरेदी केली जात असताना, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी थेट पाईपलाईनला अडथळा ठरणारी झाडे केवळ तोडण्यासाठी तब्बल प्रतिटन ६१०० रुपये मोजले आहेत. ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्यांचा मसाला’ अशा पद्धतीच्या अजब कारभाराचा शनिवारी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत जाहीर पंचनामा झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराचे बिल रोखण्याचे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना राबविली जात आहे. या योजनेतील जलवाहिनी टाकण्यासाठी खुदाई करण्यात येत असून या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडावी लागत आहेत. झाडे तोडण्याचा ठेका बांड नावाच्या ठेकेदारास देण्यात आला आहे; परंतु हा ठेका ६१०० रुपये प्रतिटन या दराने दिला आहे. म्हणजे एक टन झाडे तोडली की त्याचा मोबदला म्हणून ६१०० रुपये द्यायचे आहेत; परंतु हा दर लाकडापेक्षा जादा असल्याने नगरसेवक सत्यजित कदम, अजित ठाणेकर यांनी प्रकरणाचा छडा लावला. महापालिकेच्या स्मशानभूमीकरिता चार हजार रुपये प्रतिटन लाकडांची खरेदी करीत आहे. एका लाकूड व्यापाऱ्याने ३३०० रुपये प्रतिटन लाकडे देण्याची तयारी दाखविली आहे. जर एवढ्या कमी किमतीत लाकडे मिळत असतील तर त्यांचा तोडणीचा दर ६१०० रुपये कसा येऊ शकतो? अशी विचारणा कदम व ठाणेकर यांनी स्थायी समितीच्या सभेत करून आयुक्तांचे लक्ष वेधले. या विषयावर चर्चा असताना आयुक्त पी. शिवशंकर सभागृहात नव्हते; पण ते सभागृहात येईपर्यंत कामकाज थांबवावे, अशी सूचना कदम यांनी केली. आयुक्त शिवशंकर यांना निरोप गेल्यानंतर ते लगेच सभागृहात उपस्थित झाले. त्यांच्यासमोर लाकूड तोडण्याच्या कामात आंबा पाडला जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच दरातील तफावत त्यांना पटवून देण्यात आली. विशेष म्हणजे लाकूडतोडणीचा दर हा प्रमाणापेक्षा जास्त असल्याने अनेकांकडून दर मागवून त्याचा ठेका द्यावा, अशी शिफारस लेखापरीक्षक गणेश पाटील यांनी केली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष करुन काही अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदार बांड यांना ठेका दिला, असा आरोप सत्यजित कदम यांनी यावेळी केला. ठेकेदाराने आतापर्यंत तोडलेल्या १५१ टन लाकडांचे ९ लाख ६७ हजार रुपयांचे बिल देण्याचा निर्णय शनिवारच्या सभेत घेण्यात येणार होता. (प्रतिनिधी) कंटेनरची दुरुस्ती रखडलीयंत्रशाळा विभागाकडील अधिकाऱ्यांच्या हट्टापायी कचरा उठावाच्या कामात आवश्यक असलेल्या कंटेनर दुरुस्तीचे काम रखडल्याचा आरोप कदम व ठाणेकर यांनी केला. मागच्या वेळी ३३ हजार ५०० रुपयांना एक याप्रमाणे कं टेनरच्या दुरुस्तीचा खर्च आला होता. आता तर नवीन कंटेनरची खरेदी ४५ हजार रुपयांनी करावयाची आहे. कंटेनर खरेदी करण्यापेक्षा महापालिकेच्या यंत्रशाळेत त्याची दुरुस्ती करण्यात यावी, असे आदेश आयुक्तांनी देऊनही त्याचे पालन अधिकाऱ्यांनी केले नाही. बाहेरील ठेकेदारांकडून त्यांची दुरुस्ती करून काही अधिकाऱ्यांना मलिदा मिळवायचा आहे, असा आरोप ठाणेकर यांनी केला.